राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) - PARAKH २०२३ अंमलबजावणी संदर्भात जिल्हास्तर समन्वयक व जिल्हा सहाय्यक समन्वयक यांचे प्रशिक्षण व सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेची पडताळणी करणेबाबत
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२३ - PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.
करिता त्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ व ३ अन्वये राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सदर उपक्रमाचे वेळापत्रक या कार्यालयास पाठविले होते. त्यानुसार संदर्भ क्र. ५ अन्वये जिल्ह्यांना नियोजन कळविण्यात आले आहे. परंतु संदर्भ क्र. ६ नुसार NCERT नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त पत्राद्वारे सदर सर्वेक्षणाबाबत काही बदल करण्यात आलेले होते ते जिल्ह्यांना कळविण्यात आलेले आहेत.
सदर सर्वेक्षणाच्या अंमलबजावणी बाबत दिनांक ५ व ६ ऑक्टोबर २०२३ रोजी NCERT, नवी दिल्ली यांचेमार्फत राज्य समन्वयकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांचे प्रशिक्षण दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळ सत्रात १२.०० ते २.०० या वेळेत ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांचेकरिता तयार करणेत आलेल्या Whatsapp group वर सदर प्रशिक्षणाची लिंक यथावकाश पाठविण्यात येईल. राज्यस्तर प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांनी जिल्हास्तरावर तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांचे प्रशिक्षण दिनांक १९ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे.
तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेकडून निवडक शाळांची यादी (ज्या शाळांमध्ये सर्वेक्षण घेण्यात येणार आहे) या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. त्या यादीतील शाळांची खालील निकषांच्या आधारे पडताळणी करावी.
शाळा पडताळणीचे निकष :-
- निवडलेल्या शाळेत इयत्ता ३ री, ६ वी, व ९ वी मध्ये (सर्वेक्षणासाठी निवडलेल्या इयत्तेत) ५ किंवा ५ पेक्षा कमी विद्यार्थी असू नयेत.
- सर्वेक्षणासाठी प्रतिवर्ग विद्यार्थी नमुना ( संख्या ३० ) असणे अपेक्षित आहे. परंतु ३० पेक्षा कमी किंवा ०५ पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तरी त्या शाळेत सर्वेक्षणासाठी योग्य समजण्यात याव्यात.
- उपरोक्त निकषांना अनुसरून जिल्हा समन्वयक यांनी NCERT, नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त यादीतील शाळांची पडताळणीबाबत दिनांक १८/१०/२०२३ अखेर कार्यवाही खालीलप्रमाणे करावी.
१. जर नमुना शाळा निकषास पात्र नसेल तर evaluationdept@maa.ac.in या इमेलवर लिखित स्वरुपात मागणी करावी.
२. शाळा बदलताना कोणत्याही परिस्थितीत हे बदल १५% पेक्षा जास्त नसावे.
३. जर एखाद्या शाळेत सर्वेक्षणाच्या दिवशी क्षेत्रीय अन्वेषकस शून्य उपस्थिती आढळल्यास त्याने फिल्ड नोट मध्ये माहिती नोंदवावी व ती जिल्हा समन्वयकाकडे सादर करावी.
४. सर्वेक्षणाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- सदर निवडलेल्या शाळांची यादी ही फक्त पडताळणीसाठी असल्याने तिची गोपनीयता बाळगण्यात यावी.
- सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने वेळोवेळी करण्यात येणा-या कार्यवाहीचे अपडेट्स ( प्रशिक्षणाची क्षणचित्रे, व्हिडीओ ) समाजमाध्यमांद्वारे अपलोड करावेत. अपलोड करीत असताना #Maharashtra SEAS २०२३ आणि # PARAKH या हॅशटॅगचा वापर करावा.
सर्वेक्षणाची यशस्वी अंमलबजावणी होणेकरिता उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांना आलेल्या अडचणी व समस्या या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर SEAS नियंत्रण कक्ष स्थापन करणेत आलेला आहे. या अंतर्गत सोबत जोडलेल्या यादीतील संबधित अधिका-यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करू शकता.
तसेच जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांना सर्वेक्षणाच्या अनुषंगाने येणा-या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा SEAS नियंत्रण कक्ष स्थापन करावा व त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणपूर्व, सर्वेषण कालावधीत व सर्वेक्षणा नंतर येणा-या समस्यांचे निराकरण करावे.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .