समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके सन २०२३ - २४ करिता पुरवठा करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांना जोडलेल्या वह्यांच्या पृष्ठांवरील नोंदी व तपासणीबाबत सविस्तर सूचना

 समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके सन २०२३ - २४ करिता पुरवठा करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांबाबत




MPSP चे राज्य प्रकल्प संचालक श्री प्रदीप कुमार डांगे यांनी दि १० ऑक्टोबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि....

उपरोक्त संदर्भ १ अन्वये कळविण्यात येते की, शालेय वर्ष २०२३ - २४ साठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे यांनी एकात्मिक बालभारती ही पाठ्युस्तके इयत्ता १ ते ८ साठी चार भागांमध्ये उपलब्ध करुन दिलेली आहेत. ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषय निहाय पाठ / धडे / कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत. संदर्भ २ अन्वये पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने शिक्षकांसाठी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. यामध्ये वहीच्या पृष्ठांचा वापर व सदर पृष्ठांवर कोणत्या नोंदी करता येतील हे नमूद केलेले आहे. उपरोक्त उपक्रमांचा उद्देश सुध्दा सदर परिपत्रकात नमूद केलेला आहे. तथापि पाठ्यपुस्तकांमध्ये

जोडलेल्या वह्यांच्या पृष्ठांवरील नोंदी व तपासणीबाबत सविस्तर सूचना पुढीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे.

१) विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानांवर "माझी नोंद" या शिर्षकाखाली दैनंदिन अध्यापनातील मुद्दे दिनांकनिहाय नोंदविले आहेत का ते तपासणे.

२) सदर नोंदीमध्ये संदर्भ, वर्तमानपत्रातील विषयाच्या अनुषंगाने आलेली माहितीची नोंद केलेली आहे का ते तपासावे.

३) पाठ्यपुस्तकातील अध्ययनाशी संबंधित पूरक वाचनाच्या पुस्तकातील माहिती नोंदविली आहे का ते तपासावे.

४) कच्चे काम (पेन्सिलने), सूत्रलेखन, महत्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे,पाढे तयार करणे, पडताळणी करणे इ. नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद, तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंद केलेली आहे का ते तपासावे.

५) शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्वाचे जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहेत का ते तपासावे.

६) विद्यार्थ्याने एका विषयाचा सहसंबंध दुसऱ्या विषयाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे का व त्याच्या नोंदी सदर पृष्ठावर केलेल्या आहेत का ते तपासावे.

७) विद्यार्थ्यांना येणाऱ्या शंका, त्यावरील शिक्षकांनी केलेल्या कृतीची नोंद सदर पृष्ठावर केलेली आहेत की तपासावे.

८) विद्यार्थ्यांनी विमर्शी किंवा चिंतनशील मुद्याच्या नोंदी केल्या आहेत का ते तपासावे.

९) पालकांची सदर नोंदी तपासल्या आहेत का तसेच त्यावर पालकांचे काही अभिप्राय प्राप्त

झाले आहेत का ते तपासावे.

१०) पालकांच्या अभिप्रायानुसार शिक्षकांनी काय कृती केली आहे ते तपासावे.

११) विद्यार्थ्यांना सदर नोंदीमधून स्वयंअध्ययनाची सवय लागली आहे का ते तपासावे.

१२) विद्यार्थ्यानी स्वत: संदर्भ काढायला अवगत झाले आहे का तसेच त्याचे उपयोजन विद्यार्थ्याना करता येते का ते तपासावे.

१३) विद्यार्थ्यांना नोंदी करणेसाठी आवड निर्माण झाली आहे की याबाबत विद्यार्थ्यांचे अभिप्राय काय आहे ते तपासावे.

१४) विद्यार्थ्यांना प्राप्त पाठ्यपुस्तकातील वह्याच्या पानांवर त्याच विद्यार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरात

नोंदी आहेत का ते तपासावे.

१५) विद्यार्थी नोंदी करत नसतील तर ते का करत नाही त्याची कारणे शोधणे.

१६) विद्यार्थ्यांनी नोंदी करण्यासाठी शिक्षकांनी कोणते प्रयत्न केले आहेत ते तपासणे.

१७) विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकातील वह्यांच्या पानांचा गैरवापर केला आहे का तसेच गैरवापर केला असल्यास शिक्षकांनी त्यावर काय कृती केली आहे ते तपासावे.

उपरोक्तनुसार प्रत्यक्ष काही शाळाभेटी देवून तपासणी करण्यात यावी व तपासणीचा

अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .