पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनोत्तीबाबत

 पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनोत्तीबाबत




                  शिक्षण संचालक प्राथमिक श्री शरद गोसावी यांनी दि 6 ऑक्टोबर २०२३ रोजी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना विनंती केली आहे कि.....

महोदय, उपरोक्त विषयाबाबत सविनय सादर करण्यात येते की, शासन निर्णय दि. १४/११/१९७९ मधील तरतुदीनुसार इयत्ता ५ वी ते ७ वी या गटाकरिता निश्चित केलेल्या शिक्षकांच्या एक चतुर्थांश (२५ टक्के) पदावर पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली जात असे. इयत्ता ५ वी ते ७ वी च्या वर्गाकरिता २५ टक्के पदावर नियुक्त पदवीधर शिक्षकांना गणित / विज्ञान व इंग्रजी हे कठीण समजले जाणारे विषय शिकविणे अपेक्षित होते.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ राज्याने स्विकारल्यानंतर सुधारित इयत्ता ६ वी ते ८ वी या गटाकरिता शिक्षकांची किमान पात्रता पदवीधर अशी निश्चित करण्यात आलेली आहे. इयत्ता ६ वी ते ८ वी सुधारीत गट अस्तित्वात येऊन बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार या गटावर नियुक्त शिक्षकांची शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर असल्यामुळे तसेच राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE) अधिसूचना दि. २३/८/२०१० मधील तरतुदी नुसार इयत्ता ६ वी ते ८ वी पदवीधर (बी.एड) व TET उत्तीर्ण ही शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE) अधिसूचना दि. १२/११/२०१४ नूसार शिक्षकांच्या पदोन्नती,वेतनोत्तीसाठी सुध्दा TET आवश्यक आहे असे नमूद आहे. तथापि, (NCTE) २०१० च्या अधिसूचनेतील मुद्दा क्र.३ नूसार या अधिसूचनेपूर्वी जर शिक्षकांची नियुक्ती झाली असेल तर TET च्या पात्रतेतून सूट देण्यात आली आहे. (NCTE) अधिसूचना २०१० व २०१४ मधील तरतुदीचा आधार घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या वेतनोत्ती जिल्हा स्तरावर होत नसल्याने अनेक शिक्षक संघटनाना निर्देशनास आणून दिलेले आहे.

वास्तविक महाराष्ट्र राज्याने TET दि. १३ / २ / २०१३ पासून लागू केली आहे. व प्रशिक्षित पदवीधर वेतनोत्त देण्यात येणारे शिक्षकांची नियुक्ती २०१३ पुर्वीची असल्यास सदरची वेतनोत्ती देताना TET ची अट शिथिल करावी अशी या कार्यालयाची धारणा आहे. कृपया याबाबत आपल्या स्तरावरून उचित आदेश व्हावेत ही विनंती.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

  1. 2013 नंतर पदवीधर शिक्षक म्हणून प्रमोशन घेतलेल्या शिक्षकांनी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे का?

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .