प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना
Back Dated Data Entry
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत एमडीएम पोर्टलमध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन उपस्थितीच्या नोंदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे देयके तयार करुन अदायगी करण्याची कार्यपद्धती राबविली जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरु होण्यापुर्वी राज्यातील सर्व कार्यालयांना संचालनालय स्तरावरुन संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये निर्देश देण्यात आलेले होते. तथापि संचालनालय स्तरावरुन देण्यात आलेले निर्देश क्षेत्रीय स्तरावर निर्गमित होत नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. त्यानुषंगाने आपणास पुनश्च: एकदा खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१. संचालनालय स्तरावरुन संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या निर्देशानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
२. नागरी भागातील शाळांनी भरलेल्या दैनंदिन लाभार्थी संख्येच्या आधारे सद्यस्थितीत एमडीएम पोर्टलमधून माहे एप्रिल २०२३ ते माहे ऑगस्ट २०२३ या कालावधीतील देयके डाऊनलोड करण्याची सुविधा व कार्यपद्धती संबंधित जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यवाही पुर्ण करावी.
३. नागरी भागात माहे एप्रिल २०२३ ते माहे ऑगस्ट २०२३ या कालावधीतील दैनंदिन लाभार्थी संख्येच्या नोंदी एमडीएम पोर्टलमध्ये घेण्यासाठी (Back Dated Data Entry) संचालनालय स्तरावरून दि. २१/०८/२०२३ ते दि.२८/०८/२०२३ आणि दि.२९/०८/२०२३ ते दि.०३/०९/२०२३ या कालावधीत दोन वेळा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.
४. पुनश्चः एकदा माहे एप्रिल २०२३ ते माहे सप्टेंबर २०२३ या कालावधीतील दैनंदिन लाभार्थी संख्येच्या नोंदी एमडीएम पोर्टलमध्ये घेण्यासाठी (Back Dated Data Entry) संचालनालय स्तरावरुन दि. १९/१०/२०२३ ते दि.३१/१०/२०२३ या कालावधीत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उक्त कालावधीतील माहिती भरण्यासाठी अंतिम संधी देण्यात येत आहे.
५. संचालनालय स्तरावरुन देण्यात आलेल्या निर्देशानुसार व एमडीएम पोर्टलमध्ये देयके अदायगी करण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार यापुढील कालावधीत केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांची देयके एमडीएम पोर्टलमध्ये नोंदविण्यात आलेल्या दैनंदिन लाभार्थी संख्येनुसार ऑनलाईन पद्धतीनेच अदा केली जातील याची दक्षता घ्यावी.
६. शासनाच्या education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विविध आवश्यक माहिती वेळच्या वेळी अद्ययावत होईल याची खातरजमा जिल्ह्यानी करणे आवश्यक आहे. याकरीता नियमितपणे संकेतस्थळावरील माहितीचा तालुकानिहाय आढावा घेण्यात यावा व आवश्यक सूचना तालुक्यांना देऊन सर्व ऑनलाईन कामकाज विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
योजनेंतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांची शाळानिहाय दैनंदिन लाभार्थीची माहिती एमडीएम पोर्टलमध्ये भरण्याबाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ क्षेत्रीय कार्यालयांना व शाळांना आवश्यक ते निर्देश देऊन विहित कालावधीत कामकाज पुर्ण करण्यात यावेत.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .