उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत


 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.

॥ प्रकटन |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे च्या सचिव अनुराधा ओक यांनी दि 6 ऑक्टोबर २०२३ रोजी परिपत्रक काढून सूचित केले आहे कि...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणान्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षा फेब्रु-मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ठ होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे आहे.




सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज (College Login) मधून Pre-list उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

इ. १२वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे-

१. शासननिर्णय क्र. गव्ह. १५१७/ प्र.क्र.१९/ संगणक, दि. १४/०८/२०१७ नुसार उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्रे स्किारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. सदर Saral Database वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत.

२. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) / औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नियमित विद्यार्थ्यांची माहिती Saral Database मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित पध्दतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत, याची नोंद घेण्यात यावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.