सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत बिंदुनामावली

  सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत बिंदुनामावली




ग्रामविकास विभागाने दि २७ ऑक्टोबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि.....

उपरोक्त विषयाबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ व दि.२३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या आहेत.

२. शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि.२१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत. त्यानुषंगाने सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन २०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्हयातील बिंदुनामावली तयार करण्याची प्रक्रीया पुर्ण करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत दि.०९.१०.२०२३ रोजी झालेल्या Video Confrance मध्ये संचालक शालेय शिक्षण यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार सदर बिंदुनामावली पुर्ण करुन मंजूर करण्यात आलेली बिंदुनामावली बदली पोर्टल वर अपलोड करण्याची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी कोणत्याही परिस्थीतीत दि.२८/१०/२०२३ ते दि.२९/१०/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी. याबाबत काही प्रश्न उदभवल्यास Vinsys IT Services या कंपनीशी संपर्क साधवा.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा 

for download click here 



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सन 2022 च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर खरे तर उर्वरीत नामांकने (अर्ज) आपोआपच रद्द ठरतात.मात्र त्या वेळी बिंदुनामावलीनुसार रिक्त पदे नसल्यामुळे आंतरजिल्हा बदल्या न झालेल्या शिक्षकांचे अर्ज प्रतिक्षाधिन समजून आता सन 2023 बिंदुनामावलीनुसार रिक्त पदे असल्यास पुन्हा आता बदल्यांचा घाट शासन घालू पाहात आहे. केवळ 2024 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय फायदा होण्यासाठी सरकार सत्तेवर असल्याने काहीही उलटसुलट निर्णय घेवू शकते का ?

    उत्तर द्याहटवा
  2. जिल्हातर्गत बदली प्रक्रिया लवकरात लवकर चालू कराव्यात,2018पासून शिक्षक वाट पाहत आहेत.

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .