केंद्रप्रमुख पदोन्नतीकरिता मार्गदर्शन
ग्राम विकास विभागाचे उप सचिव श्री पो द देशमुख यांनी दि १२ सप्टेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रक नुसार.........
उपरोक्त विषयांकित केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान जिल्हा परिषदेत ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना दि. १० जून, २०१४ मधील "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक)" याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
सबब, उपरोक्तसंदर्भ क्र. ३ नुसार "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) म्हणजे "बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी पदवीधर बी. एड" ही व्यावसायिक अर्हता धारण करणारे प्राथमिक शिक्षक असणे आवश्यक आहे असा आहे. त्यानुसार केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान अधिसूचना दिनांक १० जून, २०१४ मधील आवश्यक पात्रतेमधील "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक)” या पदावर ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक राहील, म्हणजेच "बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी पदवीधर बी. एड" ही व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या दिनांकापासून ३ वर्षाचा अनुभव पुर्ण करणारे शिक्षकच पात्र ठरतील.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .