राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे करण्याबाबत.

राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे करण्याबाबत.


मा. शिक्षण संचालनालय चे उपसंचालक श्री दीपक चवणे यांनी दि २२ सप्टेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार........

उपरोक्त विषयी संदर्भ क्र. ४ अन्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील FAST CMP कार्यान्वित असलेल्या ९ जिल्हयांमधील (रायगड, पुणे, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम, वर्धा.) जिल्हा परिषदेच्या शाळांमधील, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील तसेच पुणे व कोल्हापूर विभागातील महानगरपालिका/नगरपालिका/कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणा-या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर, २०२३ चे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत करण्याची आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. सदर टप्पातील आहरण व संवितरण अधिका-यांची यादी संदर्भिय शासन पत्रासोबत जोडली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास तसेच शासनास अवगत करावे.

महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव श्री तुषार महाजन यांनी दि १४ सप्टेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार........

उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्रान्वये जालना व चंद्रपूर या जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील, तसेच औरंगाबाद विभागातील महानगरपालिका / नगरपालिका / कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाचे प्रदान सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया माहे ऑगस्ट, २०२३ मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेले आहे.

आता उपरोक्त शाळांबरोबरच राज्यातील FAST CMP कार्यन्वित असलेल्या ९ जिल्हांमधील (रायगड, पुणे, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, वाशिम, वर्धा) जिल्हा परिषदेच्या शाळांमधील, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील तसेच पुणे व कोल्हापूर विभागातील महानगरपालिका / नगरपालिका / कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर, २०२३ चे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत करण्यात यावे. सदर टप्पातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची यादी सोबत जोडली आहे.


२२ सप्टेंबर २०२३ चे परिपत्रक download साठी येथे क्लिक करा.


१४ सप्टेंबर २०२३ चे परिपत्रक download साठी येथे क्लिक करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.