UDISE+ SDMS पोर्टल मध्ये Student Promotion कसे करावे ?
Student Promotion करताना कोणती काळजी घ्यावी ?
UDISE+ SDMS पोर्टल मध्ये student promotion कसे करावे ?
- प्रथमता गुगलवर जाऊन यु-डायस प्लस असे सर्च करावे. udise + वेबसाईट वर जा. यु-डायस होम पेज ओपन होईल. खालील स्क्रीन मध्ये पहा. लॉगिन फॉर ऑल मॉडेल्स याला क्लिक करावे.
https://sdms.udiseplus.gov.in/api/v1/login
(किंवा आपण वरील लिंक ला क्लिक करून थेट login पेज वर जावू शकता.)
- यामध्ये Students Module याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करावे व गो म्हणावे. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- महाराष्ट्र ला क्लिक करा. खालील स्क्रीन मध्ये पहा.
https://sdms.udiseplus.gov.in/api/v1/login
(किंवा आपण वरील लिंक ला क्लिक करून थेट login पेज वर जावू शकता.)
- आपल्या शाळेचा udise कोड व पासवर्ड, CAPTCHA कोड टाकून login करावे. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- आता आपल्यासमोर 2023-24 व सन 2024-25 अशा दोन स्वतंत्र टॅब दिसतील.या ठिकाणी 2024-25 ची माहिती भरावयाची असल्याने 2024-25 या टॅबला क्लिक करावे. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- आपल्यासमोर स्टुडन्ट dashboard ओपन होईल. डाव्या बाजूला असलेल्या प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटी या टॅबला क्लिक करावे. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- या पेज मध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रमोशन न केल्यामुळे लिस्ट ऑफ ऑल स्टुडन्ट मध्ये कोणताही विद्यार्थी दिसणार नाही. या टॅब मध्ये सर्व विद्यार्थ्यांची माहिती झिरो दिसेल. प्रमोट करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटी याच्या मध्ये जावे लागेल.यानंतर आपल्यासमोर अशा तीन टॅब दिसतील याच्या मध्ये प्रमोशन करण्यासाठी प्रोग्रेसन मॉडेल या टॅब वर आपल्याला जावं लागेल. गो ला क्लिक करावे लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- गो ला क्लिक केल्या नंतर ज्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन करायचे आहे तो वर्ग निवडावा व ते सेक्शन निवडावे लागेल. आणि गो म्हणावे लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- गो म्हटल्यानंतर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती ओपन होईल. आपल्याला त्या प्रत्येक वर्गाची स्वतंत्रपणे फक्त त्याच वर्गाची माहिती ओपन होईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावापुढे ज्या त्या टॅब आपल्याला भराव्या लागतील. याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह स्टेटस याच्यामध्ये प्रमोटेड, मार्क्स या टॅब मध्ये त्याची टक्केवारी पूर्णांकात टाकावी . स्कूल अटेंडेड याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचे हजर दिवस, त्यानंतर स्कूलिंग स्टेटस याच्यामध्ये तो सध्याच्या शाळेत शिकत आहे की TC घेवून शाळा सोडून गेलेला आहे हे सिलेक्ट करावे लागेल. नंतर सेक्शन निवडून त्यानंतर update म्हणावे लागेल.आपल्यासमोर
Student Details Updated Successfully
असा मेसेज दिसेल व स्टेटस मध्ये पेंडिंग च्या एवजी done दिसेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- अशी सर्व विद्यार्थ्यांची माहिती सर्व टॅब भरून अपडेट करावे लागतील. त्या त्या वर्गाची सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर सर्वात खाली शेवटी असणाऱ्या FINALIZE ला क्लिक करावे लागेल.अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व विद्यार्थी promote करायचे आहे. वर्गातील सर्व विद्यार्थी promote झाल्यानंतर शेवटी असलेल्या Finalize या टॅबवर क्लिक करून तिथे आपल्याला promote झालेली संख्या दिसेल ते बरोबर असल्यावर confirm यावर क्लिक करायचे आहे.
Successfully असा मेसेज दिसेल.
खालील स्क्रीन मध्ये पहा.
- अशा पद्धतीने आपला एक वर्ग promote झालेला असेल. याच पद्धतीने आपल्याला शाळेतील इतर वर्ग सुद्धा promote करायचे आहेत. वरील प्रमाणे सर्व वर्ग प्रमोट झाल्यानंतरच आपल्याला शेवटी सर्व data finalize करावा लागणार आहे . summary मध्ये माहिती भरलेली चेक करून finalize करण्यासाठी finalize progression मध्ये जावे लागेल.
- finalize progression ला क्लिक केल्यानंतर सर्व महत्वाच्या सूचना काळजीपूर्वक वाचा.चेक box ला क्लिक करून submit ला क्लिक करा.
Successfully असा मेसेज दिसेल.
आपली प्रमोशन ची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.धन्यवाद
कृपया "प्रोग्रेशन मॉड्यूल" पूर्ण करण्यापूर्वी खालील मुद्दे वाचा
- प्रमोशन मॉड्यूल तुमच्या शाळेसाठी निष्क्रिय केले जाईल.
- तुमच्या शाळेसाठी आयात मॉड्यूल सक्रिय केले जाईल.
- कोणत्याही विद्यार्थ्याला अतिरिक्त परवानगी दिली जाणार नाही.
- 2024-25 शैक्षणिक वर्षातील उपक्रम तुमच्या शाळेसाठी सक्षम होतील.
- एकदा प्रगती मॉड्यूल पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित केल्यानंतर, ते या शैक्षणिक वर्षात पुन्हा उघडले जाणार नाही.
- मी याद्वारे घोषित करतो की डेटा कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आणि विसंगतींपासून मुक्त आहे.
IMP टीप : data finalize करण्यापूर्वी वरील सूचना काळजीपूर्वक वाचा व मगच चेक box ला क्लिक करून submit ला क्लिक करा.
मार्गदर्शिका pdf मध्ये download करण्यासाठी येथे click करा.
- त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. धन्यवाद
जे विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेले आहेत.
त्याची माहिती अपडेट करताना left school with tc ऐवजी studying in this school अशी नोंद केली असेल व
शाळा माहिती finalize केली असेल तर काय करावे...?
अशा विद्यार्थ्यांचा National code copy करून डाव्या बाजूच्या Transfer certificate module वर क्लिक करून
National code टाकून Go वर क्लिक करा,
नंतर left school already with tc वर क्लिक करा
Confirm करा,
शाळा सोडल्याचा दिनांक व captcha code व remarks मध्ये parrent request टाकून Submit करा.
समोरची शाळा आता त्या विद्यार्थ्याला Import करू शकेल.
very nice sir ji
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाDelete kase karayche sir
उत्तर द्याहटवाU dise संबंधात संपूर्ण माहिती पाठवल ही अपेक्षा..नमस्कार
उत्तर द्याहटवा2022-23 एक विध्यार्थी घेतला गेला 2023-24 नाव समाविष्ट करता येईल का
उत्तर द्याहटवा2022-23 चे विद्यार्थी कसे ऍड करू
हटवा
उत्तर द्याहटवाशाळेतील शेवट चे वर्ग कसे प्रमोद करावे
Ok , good
उत्तर द्याहटवासुरवातीला कोणताही वर्ग घेतला तर चालतो काय?
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .