PM SHRI योजनेतील दुसरा टप्प्यातील शाळा निवडीसाठी, PM SHRI पोर्टलवर शाळा नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिल्याप्रमाणे विहित कालावधीत कार्यवाही करणेबाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ १ व ३ अन्व्ये, PM SHRI शाळांची निवडीकरीताचा दुसरा टप्पा सुरु झाल्याबाबत भारत सरकारने दि. ३१/०७/२०२३ व १०/०८/२०२३रोजीच्या पत्रान्वये कळविलेले होते. त्यानुसार संदर्भ २ व ३ अन्वये, PM SHRI योजनेअंतर्गत शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कालमर्यादा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व व आयुक्त, महानगरपालिका सर्व यांना कळविण्यात आलेली होती.
संदर्भ ५ अन्वये, भारत सरकारने PM SHRI या योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील शाळा निवडीसाठी शाळा नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. शाळा नोंदणी मुदतवाढीचे सुधारित वेळापत्रक या कार्यालयास कळविलेले आहे. यानुषंगाने PM SHRI योजनेअंतर्गत् शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कालमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
PM SHRI School ही योजना कालबद्ध स्वरुपाची असल्याने कृपया उपरोक्त नमूद
केल्याप्रमाणे विहित मुदतीत शाळा नोंदणी व पडताळणीबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी . Bench Mark School च्या सर्व शाळांची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .