प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांच्या खात्यावर जमा केलेल्या इंधन व भाजीपाला अनुदानाबाबत.MDM Regarding fuel and vegetable subsidy credited to schools account

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांच्या खात्यावर जमा केलेल्या इंधन व भाजीपाला अनुदानाबाबत





शिक्षण संचालक (प्राथमिक) श्री शरद गोसावी यांनी दि १4 सप्टेंबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...



प्रथमत: Phase1 मध्ये सरल प्रणालीतील पटसंख्येच्या आधारे माहे एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ कालावधीतील ११३ कार्यदिनाकरीता प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरुन ७०% अनुदान शाळांच्या खात्यावर PFMS प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आलेले होते. तद्नंतर एमडीएम पोर्टल (MDM Portal) मध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन माहितीच्या आधारावर वेळोवेळी संगणकीय प्रणालीद्वारे देयके तयार करून प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून अनुदान शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा केले आहे. याबाबतचा सविस्तर तपशिल या पत्रासोबत Excel Format मध्ये उक्त तक्त्यानुसार पाठविण्यात येत आहे.

सदर अनुदानाबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे.

१. उक्त नमूद Excel Format मधील अनुदान वितरणाची माहिती आपण सर्व तालुके व शाळांना उपलब्ध करुन द्यावी.

२. Phase 1 द्वारे शाळांना वितरित केलेल्या अनुदानाचा ताळमेळ घेण्यात यावा.

३. Phase 2 ते Phase 8 अन्वये शाळांना दिलेले अनुदान MDM Portal द्वारे तयार झालेल्या देयकानुसार संबंधित यंत्रणेस अदा करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात. सदर अनुदानाची रक्कम ही अतिप्रदान होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

४. Phase 9 द्वारे माहे ऑगस्ट २०२३ मध्ये शाळांना अदा केलेल्या इंधन व भाजीपाला अनुदानाच्या रक्कमेनुसार माहे सप्टेंबर २०२३ ते माहे डिसेंबर २०२३ या कालावधीकरीता देय असणाऱ्या अनुदानाच्या ७५% अनुदान अग्रीम स्वरुपात शाळा स्तरावर वर्ग करण्यात आले आहे.

सदर अनुदान आहार शिजविणाऱ्या यंत्रणांना अदा करण्यापूर्वी खालीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी.

अ) माहे सप्टेंबर ते डिसेंबर २०२३ कालावधीतील इंधन भाजीपाला अनुदान आहार शिजविणाऱ्या यंत्रणांना शाळा प्रशासनाद्वारे अदा करण्यापूर्वी प्रत्येक महिन्याच्या अखेरीस MDM Portal मध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन माहितीच्या आधारावर तयार झालेल्या देयकानुसारच देय असणारे १००% इंधन भाजीपाला अनुदान शाळा प्रशासनाने संबंधित यंत्रणेस अदा करावे.

आ) माहे डिसेंबर २०२३ अखेर MDM Portal मध्ये शाळांनी भरलेल्या माहितीच्या आधारे तयार झालेली देयके अदा करण्याकरीता शाळा स्तरावर अनुदान कमी शिल्लक असल्यास आवश्यक अनुदानाची मागणी आपण संचालनालयाकडे नोंदवावी.

इ) सदर निधीबाबत प्रत्येकी दोन महिन्याला प्रत्यक्ष लाभार्थी विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने ताळमेळ घेऊन संबंधित जिल्ह्यांनी निधीचे समायोजन करावे व तसा अहवाल संचालनालयास सादर करावा.

५. तालुका स्तरावर विशेष शिबिराचे आयोजन करुन अधीक्षक, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना यांचेमार्फत सर्व शाळांच्या बँक स्टेटमेंट व ऑनलाईन देयकांनुसार ताळमेळ घेण्यात यावा.

सदर ताळमेळ घेताना खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

अ) शाळांना Phase 1 द्वारे दिलेले इंधन भाजीपाला अनुदान अद्यापही अतिरिक्त होत आहे. अशा शाळांचे अतिरिक्त होणारे अनुदान वसूल करुन सदरची रक्कम योजनेच्या इंडियन बँक/ जिल्हा स्तरावरील बँक खात्यावर जमा करुन घेण्यात यावी.

आ) तांत्रिक कारणास्तव एका शाळेचे अनुदान दुसऱ्या शाळेच्या खात्यावर जमा झाले असल्यास, सदर अनुदानाचे समायोजन आपल्या स्तरावरुन करण्यात यावे. (उदा. X शाळेचे अनुदान Y शाळेच्या खात्यावर जमा झाले व Y शाळेचे अनुदान X शाळेच्या खात्यावर जमा झाले असल्यास अतिरिक्त जमा झालेल्या शाळेचे अनुदान कमी जमा झालेल्या शाळेच्या खात्यावर वर्ग करुन घेण्याची कार्यवाही करावी. अथवा X शाळेचे अनुदान Y शाळेस जमा झाले परंतु X शाळेस अनुदानच जमा झाले नसल्यास अशा परिस्थितीमध्ये आवश्यक अनुदानाची मागणी नोंदविण्यात यावी. तसेच सदरचे अनुदान जादा होत असल्यास ती रक्कम वसूल करुन इंडियन बँक / जिल्हा स्तरावरील बँक खात्यामध्ये जमा करुन घेण्यात यावी.)

इ) वरील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या Phase निहाय याद्यांतील ज्या शाळा केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येत आहेत आणि त्या शाळांच्या खात्यावर इंधन भाजीपाला अनुदान तांत्रिक कारणामुळे जमा झाले आहे. अशा शाळांच्या खात्यावरील वर्ग झालेले इंधन भाजीपाला अनुदान तात्काळ वसूल करुन इंडियन बँक / जिल्हा स्तरावरील बँक खात्यावर जमा करुन घेण्यात यावे.

ई) ज्या शाळांना अद्यापही इंधन भाजीपाला अनुदान प्राप्त झाले नाही. अशा शाळांची माहिती विहित नमुन्यामध्ये संकलित करुन त्याकरीता आवश्यक अनुदानाची मागणी संचालनालयाकडे नोंदवावी.

६. अनुदान समायोजनाची कार्यवाही करताना सद्यस्थितीत केवळ इंधन भाजीपाला या घटकांतर्गत बाबीचेच समायोजन करण्याची कार्यवाही करावी. योजनेच्या इंडियन बँक / जिल्हा स्तरावरील बँकेच्या खात्यावर जमा करुन घेतलेल्या रक्कमेचा ताळमेळ घेण्यात यावा व सदरचे लेखे अद्ययावत ठेवण्यात यावेत. तसेच सदर बाबतचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक पहा


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .