प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा आयोजित करणे बाबत.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा आयोजित करणे बाबत.



शिक्षण संचालक प्राथमिक श्री शरद गोसावी यांनी दि 29 ऑगस्ट २०२३ रोजी

परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत कि...

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रस्तुत उपक्रमांतर्गत शाळा / केंद्र व तालुकास्तरावर अनेकविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी व शिक्षक यांनी सहकार्याने परसबाग विकसित केलेल्या आहेत. विकसित करण्यात आलेल्या परसबागेतील उत्पादीत भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे. केंद्र शासनाने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिलेले आहेत

बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या आहारातून पौष्टिक तृणधान्यांचा वापर कमी होत चालला आहे. वास्तविकत: पौष्टिक तृणधान्यांचा उपयोग आपल्या रोजच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी होणे आवश्यक आहे. आपला आहार हा कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वांनी समृध्द असणे आवश्यक आहे. सदर गरज तृणधान्यामधून भागविणे शक्य आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्ययुक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे. याकरीता तृणधान्यापासून निर्मित विविध पाककृतींचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळापणा मिळेल व सदरचा आहार विद्यार्थी आवडीने खाऊ शकतील.देशामध्ये "सप्टेंबर" महिना पोषणमाह म्हणून साजरा करण्यात येत आहे. याअनुषंगाने राज्यामध्ये दि. ०१ सप्टेंबर, २०२३ ते दि. १५ सप्टेंबर, २०२३ या कालावधीमध्ये शाळा व तालुकास्तरावर पाककृती स्पर्धाचे आयोजन करावयाचे आहे.

पाककृती स्पर्धांचे आयोजनाबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. शाळास्तर:-

पालक,नागरिक व योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धांचे आयोजन करणे व एका उत्कृष्ट पाककृतींची निवड तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी करणे.प्रस्तुत उपक्रमाचे आयोजन शक्यतो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुस-या आठवड्यामध्ये करावे.

• शाळा परिसरातील जास्तीत जास्त माता-पालक या उपक्रमांमध्ये सहभागी होतील याकरीता आवश्यक ती जनजागृती करणेत यावी.

२. तालुकास्तर :-

• शाळास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या पाककृतींची स्पर्धा तालुकास्तरावर घेणेत यावी.

तालुकास्तरावरील स्पर्धा दुस-या आठवड्यामध्ये घेण्यात यावी.

 पाककृती स्पर्धांचे आयोजन शाळा व तालुकास्तरावर विहित कालावधीमध्ये होईल याची दक्षता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी घ्यावयाची आहे.

५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्याकरीता आवश्यक अनुदानाची मागणी विहित नमुन्यामध्ये संचालनालयाकडे करावी.

६. प्रस्तुत उपक्रमास आवश्यक ती प्रसिध्दी वर्तमानपत्र व समाजमाध्यमाद्वारे देण्यात यावी.

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा पाककृती स्पर्धा या उपक्रमामध्ये सहभागी

होतील, याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी.



अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा व download करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.