सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदविलेल्या ४,०७१ शाळांमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येत घट झाल्यामुळे करावयाच्या कार्यवाहीबाबत.

 सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदविलेल्या ४,०७१ शाळांमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येत घट झाल्यामुळे करावयाच्या कार्यवाहीबाबत.



आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.


MPSP ने दि 9 ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केलेले केले आहे कि......

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील विद्यार्थ्यांची सविस्तर नोंदणी यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सुरू आहे. दि. ०८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या अहवालानुसार ४,०७१ शाळांमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येने घट झालेली आहे. त्याची यादी आपणास तपासणीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. व्यवस्थापननिहाय राज्याचा अहवाल पुढील प्रमाणे आहे.



विद्यार्थ्यांची नोंद यु-डायस प्लस प्रणालीमध्ये करणेबाबत या कार्यालयाकडून वारंवार पत्र व्यवहार केला असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तरी देखील अद्याप विद्यार्थ्यांची नोंद १००% पूर्ण झालेली नाही. सदर बाब अत्यंत गंभीर असून याचा परिणाम पुढील वर्षाच्या समग्र शिक्षा योजनेच्या वार्षिक नियोजन व अंदाज पत्रकावर होईल.

तरी आपणास कळविण्यात येते की, सोबत १०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या घट झालेल्या ४,०७१ शाळांची यादी तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्वरीत

जिल्ह्यातील तालुका व केंद्र स्तरावरील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तपासणी करण्याकरिता आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. माहितीमध्ये त्रुटी असल्यास त्वरीत शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याकरिता आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्या व जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी गट शिक्षणाधिकारी यांचेकडून शाळानिहाय विद्यार्थी संख्येची खात्री केल्याचा अहवाल घेवून एकत्रित करून आपल्या स्वाक्षरीने या कार्यालयास पाठविण्याकरिता आदेशित करावे.

यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील ९५.७८% विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी यु-डायस प्रणालीमध्ये झालेली आहे. त्यापैकी ५३.४५% विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आधार व्हॅलिडेशन शाळांच्या लॉगिनमध्ये पूर्ण झालेले आहे. उर्वरित ४६.५५% एवढे विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पुनश्च: शाळेच्या लॉगिंनमधून करून घेण्याकरिता आपल्या स्तरावरून मुख्याध्यापकांना आदेशित करावे.

यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील ३७,५२९ (Not Started) व ६९, २९८ (Progress) एवढे विद्यार्थ्यांची माहिती शाळेच्या लॉगिनमधून पूर्ण झाली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आपल्या स्तरावरून आढावा घेवून अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दि. २१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत पूर्ण करण्याकरिता आदेशित करावे.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.