सन २०२२-२३ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक माहिती राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरून ऑनलाईन पध्दतीने माहितीचे प्रमाणपत्र प्रमाणित करून दि.३०/०८/२०२३ पर्यंत अपलोड करणेबाबत.

 सन २०२२-२३ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक माहिती राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरून ऑनलाईन पध्दतीने माहितीचे प्रमाणपत्र प्रमाणित करून दि. ३०/०८/२०२३ पर्यंत अपलोड करणेबाबत.




MPSP चे राज्य प्रकल्प संचालक श्री प्रदीपकुमार डांगे यांनी दि ३० ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचना दिल्या आहेत कि....

उपरोक्त विषयान्वये भारत सरकारकडून दि.०८/०८/२०२३ रोजी युडायसबाबत ऑनलाईन पध्दतीने सर्व राज्याची आढावा मिटींग घेतली होती. सदर मिटींगमध्ये PGI चे गुणांकनामध्ये वाढ होण्याच्या अनुषंगाने दि. २१/०८/२०२३ पर्यंत केंद्र शासनाकडे युडायस प्रणालीमध्ये माहिती अद्यायावत करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याकरिता विनंती केली होती सदर विनंतीस केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली.दि.३०/०८/२०२३ रोजीच्या माहितीनुसार राज्यातील ७७,२६१ विद्यार्थ्यांची माहिती पूर्ण झालेली नाही. याबाबत संबंधितांना दररोज कळविण्यात येत आहे, परंतू माहिती अद्यापपर्यंत अपूर्ण आहे. तथापि सदरची माहिती आजच पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात अन्यथा अपूर्ण माहिती केंद्र शासनाकडून युडायस प्रणालीमधून काढणार असल्याबाबत कळविले आहे.

संदर्भिय पत्रानुसार युडायस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांची राज्यातील माहिती दि. ३१/०८/२०२३ पर्यंत अंतिम करण्यासाठी कळविले आहे, यानंतर सन २०२२-२३ ची माहिती अद्यायावत करण्याकरिता मुदतवाढ मिळणार नाही तसेच दि.१/०९/२०२३ पासून सन २०२३-२४ ची माहिती अद्यायावत करण्यासाठी सुरू करण्यात येणार असून सदर माहिती दि. ३१/१०/२०२३ पर्यंत अंतिम करणे अनिवार्य आहे.

याबाबत आपणांस कळविण्यात येते की, जिल्हयाची व जिल्हयातील सर्व तालुक्याची माहिती शाळा, विद्यार्थी व शिक्षक दि. ३०/०८/२०२३ पर्यंत युडायस प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने सर्टीफाय करण्यात यावी. सर्व जिल्हयांच्या माहितीचे अंतिमीकरण झाल्यानंतर राज्याची माहिती दि. ३१/०८/२०२३ रोजी अंतिम करून ऑनलाईन पध्दतीने केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. याबाबत प्रथम प्राधान्याने युडायस प्लस प्रणालीचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधितांना आदेशित करावे जेणेकरून भारत सरकारला राज्याची माहिती वेळेत पाठविणे सोयीचे होईल.

अधिक माहिती साठी खाली परिपत्रक पहा व download करा.

download link क्लिक here


 





for download click here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.