इ. 5 वी व इ. 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणा व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद निर्मित 'शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून उपलब्ध करुन देणेबाबत...

  इ. 5 वी व इ. 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणा व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद निर्मित 'शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून उपलब्ध करुन देणेबाबत...


लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 साठी परीक्षा परिषदेच्या https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर दि. 01/07/2023 रोजी पासून शाळांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार होती. तथापि काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे सदर सुविधा दि. 01/07/2023 ऐवजी दि. 01/09/2023 रोजी पासून सुरु करण्यात येणार आहे. तरी आपल्या जिल्ह्यात इ. 5 वी व इ. 8 वी मध्ये शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला प्रविष्ठ होण्यास प्रोत्साहित करण्याबाबतच्या उपाययोजना आपल्या स्तरावरुन करण्यात याव्यात अशी विनंती आहे. यासाठी सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंड / मनपा निधीतून अदा केल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला बसण्याची संधी मिळेल.

सद्यस्थितीत संदर्भ क्र. 3 च्या शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. 5 वीच्या सर्व संचांकरीता रु.500/- प्रतिमाह प्रमाणे (रु.5000/- प्रतिवर्ष) व इ. 8 वीच्या सर्व संचांकरीता रु.750/- प्रतिमाह प्रमाणे (रु.7500/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे. त्याचा फायदाही विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात निश्चितच होईल.

तसेच आपल्या जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता विकासाकरीता जिल्हा परिषद सेस फंड, मनपा / इतर निधीतून परीक्षा परिषद निर्मित 'मार्गदर्शिका' संच उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी नम्र विनंती करण्यात येत आहे.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.