संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping तात्काळ पूर्ण करणेबाबत

 संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping तात्काळ पूर्ण करणेबाबत




आमच्या Whats App Group सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

शिक्षण संचानलयाने  दि 25 ऑगस्ट २०२३  रोजी परिपत्रक काढून सूचित केले आहे कि.....!!!

संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping तात्काळ पूर्ण करणेबाबत.

उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रान्वये संचमान्यतेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे Post Mapping करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती. सदर सुविधेनुसार Post Mapping ची कार्यवाही शालार्थ मध्ये तातडीने पूर्ण करणेबाबत आपणास संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतु अद्यापही शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेनुसार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे Post Mapping पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब प्रशासकीयदृष्टया योग्य नाही.

तरी संदर्भिय पत्रान्वये दिलेल्या सूचनेनुसार आपल्या जिल्हयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे संचमान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping तात्काळ पूर्ण करण्यात यावे. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी आपलेस्तरावरून संबंधित कार्यालयास सूचित करावे.

शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping पुर्ण केल्याशिवाय सप्टेंबर २०२३ चे वेतन देयक (बिल) शालार्थ प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही याची सर्व संबंधित कार्यालयांनी नोंद घ्यावी.


यां संदर्भात शिक्षण संचालकांनी दि १९ / 1/ २०२३ रोजी परिपत्रक काढून सूचित केले आहे कि.....

 संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping करणेबाबत.

उपरोक्त विषयी सूचित करण्यात येते की, संचमान्यतेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संच मान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे Post Mapping करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर सुविधेनुसार Post Mapping ची कार्यवाही शालार्थ मध्ये तातडीने पुर्ण करण्यात यावी.

तसेच विद्यमान संचमान्यतेपेक्षा शालार्थ मध्ये अधिकची पदे निर्माण केलेली असल्यास सदर पदे रद्द (Delete) करण्यात यावीत. सर्व कर्मचा-यांचे आधार क्रमांक शालार्थ प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात यावे.

अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक पहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.