अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या परंतु अधिसंख्य न केलेल्या कर्मचाऱ्यांना/ वारसांना सेवा निवृत्ती/निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन वेतनाचे लाभ देणे बाबत.

 अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या परंतु अधिसंख्य न केलेल्या कर्मचाऱ्यांना/ वारसांना सेवा निवृत्ती/निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन वेतनाचे लाभ देणे बाबत.


लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी श्री डॉ प्रा. सु. गांगुर्डे यांनी दि 11 ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि......

संदर्भ:-१. उप आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, यांचे पत्र क्र. विकास/कार्य-२ / पेन्शन/कावि/ ४७७२/२०२३/५९६,

दि. १३.३.२०२३

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. औरंगाबाद यांचे पत्र क्र. जिपऔ/ आरोग्य/आस्था-२ब/कावि/१६४/२०२३/५६०, दि.२३.०२.२०२३

३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जालना यांचे पत्र क्र. जिपजा/साप्रवि/ प्रशा-५/सेनिवे/कावि/२०२३/१२४९, दि. १२.०४.२०२३

संदर्भाधीन पत्रान्वये जिल्हा परिषदांकडील जे कर्मचारी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करु शकले नाहीत. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रकरण प्रलंबित आहेत असे कर्मचारी अधिसंख्य पदावर वर्ग न होताच सेवानिवृत्त झालेले/मूत्यू झाले आहेत अथवा सेवानिवृत्त होणार आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र समितीने रद्द करुन जप्त केले आहे अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे / कुटूंब निवृत्तीवेतनाचे लाभ देता येतील किंवा कसे याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांचे मागदर्शन घेण्यात आले असून खालील प्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत.

अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि. १४.१२.२०२२ मधील तरतूदीनुसार पदोन्नती व अनुकंपा धोरण वगळता सेवा विषयक व सेवानिवृत्ती विषयक सर्व लाभ अनुज्ञेय आहेत.

तथापि, जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीविषयक तसेच इतर अनुषंगिक लाभ देण्याबाबत निर्णय घेण्याकरीता मा. मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल."

३. तरी तूर्तास वरील अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यात यावी.


अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. अधिसंख्य झालेले ST प्रवर्गातील लोकांना SBC प्रवर्गात टाकण्यात आले आहे कारण जात प्रमाण पत्र अवैद्य ठरले आहे . अशा परिस्थितीत SBC चे लोक अतिरिक्त झालेस जे मुळात SBC प्रवार्गातून लागलेत ते अतिरिक्त ठरणार का ST मधून SBC मध्ये आलेत ते अतिरिक्त ठरणार

    उत्तर द्याहटवा
  2. या लबाडांना घरी हाकलून दिले पाहिजेत

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .