अनुसूचित जमाती - पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत
लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.
शिक्षण आयुक्त श्री सुरज मांडरे यांनी दि १७ ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रक काढून सूचित केले आहे कि....
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, अनुसूचित जमाती - पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत शासन पत्र दि. ०३.०४.२०२३ अन्वये वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परावनगी देण्यात आली आहे. अनुसूचित जमाती - पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे. पवित्र प्रणाली मार्फत अनुसूचित जमाती - पेसा मधील रिक्त पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत असल्याने या कार्यालयाकडून पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अन्य पर्यायांचा विचार करणेबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आले होते.
संदर्भ क्र. ३ शासन पत्र दि. १०.०८.२०२३ अन्वये पेसा क्षेत्रातील रिक्त भरण्याकरीता खालील प्रमाणे कार्यवाहीस मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय दि. ०१.०२.२०२३ मधील परिशिष्ट-क मध्ये नमुद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतुद आहे. सदर तरतूद लक्षात घेता आपणांस TAIT - 2022 चाचणी दिलेल्या ST-PESA उमेदवारांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर चाचणी ( TAIT - 2022 ) परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची आपल्या जिल्हयातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी.
तसेच, सदर प्रक्रीयेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर निवडीचा पर्याय यापुढे खुला ठेवण्यात आला आहे.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .