जिल्हा परिषदेमध्ये दि.०१ नोव्हेंबर, २००५ पुर्वी भरती प्रक्रीया सुरु झालेल्या तथापि, नियुक्ती आदेश दि.०१ नोव्हेंबर, २००५ नंतर दिलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत
आमच्या Whats App Group सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.
डॉ.प्र.सु.गांगुर्डे कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी दि २८ ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत कि....
संदर्भ :- १. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डी.एन.ई.१३६) संघटनेचे दि. २५.०५.२०२३ रोजीचे निवेदन,
२. रिट याचिका क्र. १८९३/२०२० व रिट याचिका क्र. ३७४६/२०२३ वरील मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे दि. ११ ऑगस्ट, २०२३ रोजीचे आदेश.
उपरोक्त विषयांकीत प्रकरणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डी.एन.ई.१३६) चे संदर्भाधीन क्र.१ येथील निवेदन सोबत व मा. उच्च न्यायालयाचे संदर्भाधीन क्र. २ येथील आदेश सोबत जोडले आहेत.
२. प्रस्तूत निवेदनान्वये दि.०१ नोव्हेंबर, २००५ पुर्वी भरती प्रक्रिया सुरु झालेल्या, तथापि नियुक्ती आदेश दि.०१ नोव्हेंबर, २००५ नंतर दिलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत विनंती केली आहे. तसेच या अनुषंगाने संदर्भाधीन क्र.२ येथील रिट याचिकांमध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सहा आठवड्यात शासन निर्णय निर्गमित करण्याचे आदेश दिलेले आहेत.
३. तरी या अनुषंगाने आपल्या जिल्हा परिषदेची माहिती तात्काळ शासनास सादर करावी, ही विनंती.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .