दि 1 सप्टेंबर ते दि ८ सप्टेंबर या कालावधी मध्ये राज्यात साक्षरता सप्ताह राबविणेबाबत Regarding implementation of Literacy Week in the state from 1st September to 8th September

दि 1 सप्टेंबर ते दि ८ सप्टेंबर या कालावधी मध्ये राज्यात साक्षरता सप्ताह राबविणेबाबत 




 आमच्या Whats App Group सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

शिक्षण संचालक (योजना) चे  डॉ महेश पालकर यांनी दि २८ ऑगस्ट २०२३ रोजी उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम संदर्भात परिपत्रक निर्गमित करून सूचना दिल्या आहे कि.......

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यास अनुसरून संदर्भ क्र. २ नुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत 'उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची' सन २०२२-२०२७ या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून ‘जन जन साक्षर' व राज्य शासनाकडून 'साक्षरतेकडून समृद्धीकडे' हे घोषवाक्ये देण्यात आलेले आहे.

संदर्भ क्र.१ नुसार दिनांक ८ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधूनसंपूर्ण देशात दिनांक १ सप्टेंबर ते दिनांक ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये 'साक्षरता सप्ताह' राबविणेबाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी व उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम Mobile App वर स्व- नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या ‘साक्षरता सप्ताह' कालावधीमध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वार्ड / गाव / शाळा / महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेले आहेत.

'उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम' यशस्वी करण्यासाठी सदरच्या साक्षरता सप्ताहाची आपल्या व सदरच्या आपल्या अधिनस्त यंत्रणांकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. सदर कार्यक्रमांतर्गत निरक्षरांना प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन दि.८ सप्टेंबर २०२३ या जागतिक साक्षरता दिनी राज्यास सुरू करण्यात यावे. अध्ययन-अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत उपलब्ध साधारणपणे १००० उपलब्ध FLN व्हिडीओ, दिक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या FLN संबंधित व्हिडीओ व उजास भाग - १,२,३,४ ची मदत घेण्यात यावी.

शिक्षणाधिकारी ( योजना) जि. प - सर्व यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक १ सप्टेंबर ते दिनांक ८ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती / निवडक फोटो रोज शिक्षणाधिकारी (योजना) WhatsApp group व directorscheme.mh@gmail.com या email वर न चुकता पाठवावेत जेणे करून केंद्र शासनाच्या google tracker वर माहिती/ निवडक फोटो सादर करणे सोयीचे होईल.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा

download click here 

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.