पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) दि. 12 फेब्रुवारी, 2023 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याबाबत I Regarding grading of students in the State Merit Scholar ship List 2023

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) दि. 12 फेब्रुवारी, 2023 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याबाबत....





महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दि ८ ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रक काढून सूचित केले आहे कि....

उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्र. 1 व 2 अन्वये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) मध्ये स्पृहणीय यश संपादन करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्ह्याच्या मा. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन दि. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करावा तसेच सदर सत्कार समारंभाची सर्व व्यवस्था संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी करावी असे शासन आदेश आहेत.

त्यानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील ( ग्रामीण / शहरी / सी.बी.एस.ई. / आय.सी.एस.सी.) विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे छपाई करून आपणास दि. 10/08/2023 रोजीपर्यंत पाठविण्यात येत आहेत. तरी आपल्या जिल्ह्यातील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आपल्या जिल्ह्याच्या मा. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते गुणगौरव करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी.

अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक वाचा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.