पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) 2022 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बँक खात्याच्या माहितीत दुरूस्ती करणेबाबत.....

  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) 2022 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बँक खात्याच्या माहितीत दुरूस्ती करणेबाबत.....



लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दि 29 ऑगस्ट २०२३ रोजी पारीपत्रक काढून सूचना दिल्या आहेत कि.... 

उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) दि. 31 जुलै, 2022 मध्ये शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्यानुसार प्राप्त माहितीतील इ. 5 वीच्या 2643 व इ. 8 वीच्या 1989 अशा एकूण 4632 विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संबंधित शाळेमार्फत चुकीची भरल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा झालेली नाही.

सदर सर्व विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय यादी सोबत जोडली असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी सदरबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व शाळांना आपल्यास्तरावरून सदरची माहिती दि. 31/08/2023 रोजीपर्यंत भरणेबाबत आदेशित करावे.

खालील परिपत्रक सविस्तर वाचा





टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सर आपसी आंतरजिल्हा बदली झालेली असल्यास जो आपसी बदली धारक आहे त्याची seniority पकडण्या बाबत चा gr पाठवा please 9767455133

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .