STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत....

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत....




लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील विषयान्वये संदर्भ क्र. २ नुसार STARS प्रकल्प मधील SIG २ - ( Improved Learning Assessment systems) २.२ अंतर्गत सन २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे ( PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

पायाभूत चाचणी उद्देश / उपयोग / फायदे

१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे .

२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.

३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.

४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.

५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होईल.




नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

पायाभूत चाचण्यांचे माध्यम व विषय :

सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

चाचणीचा अभ्यासक्रम

मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.




पायाभूत चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना

१. पायाभूत चाचणी ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

२. पायाभूत चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.

३. पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका सोबत शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूची विषयनिहाय, शाळानिहाय व इयत्तानिहाय एक प्रत याप्रमाणे शाळांना पुरविण्यात येणार आहे.

४. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

५. पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या UDISE + मधील विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात आल्या आहेत.

६. तालुकास्तरावर पोहचविण्यात आलेल्या / येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

७. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर केंद्र स्तरावर पोहचवाव्यात व तेथून तात्काळ शाळास्तरावर पोहचवाव्यात

८. प्रश्नपत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.

अ. इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा झाला असल्याची खातरजमा तालुका समन्वयकांनी करून घ्यावी.

आ. केंद्रस्तरावर शाळांच्या पटसंख्याप्रमाणे चाचण्या व शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूचीचे वितरण करावे. त्यासाठी तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे.

इ. कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्याचे झेरॉक्स काढण्यात येऊ नये. अथवा झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

ई. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.

९. प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

१०. तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.

११. जिल्हास्तरावर प्राचर्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद यांची चाचणी आयोजनाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची सर्वस्वी जबाबदारी असेल.

१२. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी.

१३. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

१४. प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासण्यात यावी.

१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्याना देऊ नये. विद्यार्थ्याना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात.

१६. पायाभूत चाचणीची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात करावी.

१७. पायाभूत चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

सर्वेक्षण कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत

१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.

२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबंधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.

अधिक माहितीसाठी परिपत्रक पहा

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .