जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत दाखल झालेल्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत
परिपत्रक दि 3 ऑगस्ट २०२३
लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र शासनाचे उपसचिव श्री. पो. द. देशमुख यांनी दि 3 ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचना दिल्या आहेत कि....
उपरोक्त विषयांकित प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीप्रक्रीयेत दाखल झालेल्या रिट याचिकांमध्ये मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे अनुपालन न केल्याचे निदर्शनास आले आहे.
२. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, शालेय शिक्षण विभागाने संदर्भ क्र.(३) येथील शासन निर्णय दि.२१/०६/२०२३ अन्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागास निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत बदलीचे सुधारित धोरण अद्याप निर्गमित करण्यात आलेले नाही. यास्तव, सन २०२३-२४ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करता आलेली नाही.
३. तथापि, मा. न्यायालयाने प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रीयेतील विविध रिट याचिकांप्रकरणी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने शासन निर्णय दि. ०७/०४/२०२१ तसेच प्रचलित धोरणानुसार ऑफलाईन पध्दतीने समुपदेशन करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुपालन करावे. कोणत्याही परिस्थितीत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .