YCMOU मार्फत B.Ed. 2023-25 प्रवेश प्रक्रिया
लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्त्वपूर्ण सूचना
१) उमेदवाराने या शिक्षणक्रमाची प्रवेश माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे या शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरावा. त्याखाली असलेल्या प्रवेश लिंक वरून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल. ऑनलाईन प्रवेशअर्ज भरताना आपण भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री उमेदवाराने करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात नंतर कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही. याची नोंद घ्यावी. प्रवेश अर्जात भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करूनच 'Submit बटण दाबावे.
२) प्रवेशअर्ज भरण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर तीन दिवस स्वतःच्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची संधी (स्वयं संपादन) उमेदवाराला देण्यात येईल. या मुदतीतच उमेदवाराने प्रवेश अर्जात आवश्यक ती दुरुस्ती करावी.
३) २०२३ - २५ बी.एड. तुकडीचा प्रवेश अर्ज भरण्यासाठी सेवा अनुभव दि. ३० एप्रिल २०२३ पर्यंत नोंदविता येईल. या तारखेनंतरचा सेवा अनुभव यावर्षीच्या प्रवेशासाठी विचारात घेतला जाणार नाहीत.
४) ऑनलाईन प्रवेशअर्जात भरलेल्या संपूर्ण माहितीचे मूळ पुरावे पडताळणीवेळी आपणाकडे अस अनिवार्य असेल. मूळ कागदपत्र सादर न केल्यास संबंधित माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.
५) बी एड. प्रवेश अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु.५००/- आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
६) ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जातील माहिती आधारे खुला व आरक्षित वर्गाची केंद्रनिहाय कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार गुणवत्ता यादीतील केंद्रनिहाय प्रवेश संख्येनुसार संबंधित विद्यार्थ्यानी विभागीय केंद्रावर आपल्या प्रवेश अर्जाची पडताळणी करून घ्यावी. विभागीय केंद्राने प्रवेशार्थीच्या प्रवेश अर्जातील भरलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर केंद्रनिहाय प्रवेश गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर विद्यापीठ व अभ्यासकेंद्र शुल्क भरून उमेदवाराने आपला प्रवेश नियोजित कालावधीत निश्चित करावा. आपल्या प्रवेशासंदर्भातील माहिती / कागदपत्रे चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाल्यास विद्यापीठ समिती मार्फत आपल्या प्रवेशाची चौकशी करण्यात येईल. तक्रारीत तथ्य आढळल्यास आपला प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेश रद्द करताना आपण भरलेले प्रवेश शुल्क परत केले जाणार नाही. तसेच आपल्यावर खोटी माहिती पुरविल्यासंदर्भात FIR दाखल केला जाईल. याची प्रवेशेच्छूनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवारांना आरक्षणाअंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे. अशा उमेदवारांनी शासन निर्णयानुसार आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे तसेच नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र विभागीय केंद्र प्रवेश अर्ज पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
७) विभागीय केंद्रावर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर प्रवेशअर्ज आपोआप लॉक होईल. त्यामुळे पडताळणी नंतर कोणत्याही बदलासंदर्भातील पत्रव्यवहार विद्यापीठाला करू नये.
८) प्रवेशार्थीनी आपल्या शाळेच्या जिल्ह्यातूनच प्रवेश अर्ज भरावा अन्यथा प्रवेशप्रक्रियेतून तो बाद होईल. जिल्हानिहाय अभ्यासकेंद्राची यादी असणारा तक्ता या माहितीपुस्तिकेत बी. एड. शिक्षणक्रमाचे अभ्यासकेंद्र या मुद्याअतर्गत देण्यात आलेली आहे.
उदा :
मुंबई उपनगर (सबअर्बन) साठी चेंबूर सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चेंबूर हे केंद्र असेल. यात बोरिवली (URC-1), कांदिवली (URC-2), गोरेगाव (URC-3), अंधेरी (URC-4), सांताक्रूझ (URC-5), भांडूप (URC-6), घाटकोपर (URC-7), चेंबूर (URC-8), कुर्ला ( URC-9), घाटकोपर (DYD_URC3), अंधेरी (DYD_URC5), मालाड W (DYD_URC6), कांदिवली E (DYD_URC7), हे भाग असतील. मुंबई शहरासाठी एस.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालय धोबीतलाव हे अभ्यासकेंद्र असेल. यात परेल (URC-10), दादर (URC-11), भायखळा (URC-12), अँटरोड (DYD_URC1), सायन (DYD_URC2), मुलूड (DYD_URC4) हे भाग असतील.ठाणे व पालघर या जिल्ह्यासाठी सेवासदन कॉलेज ऑफ एज्युकेशन, उल्हासनगर असेल.रायगड जिल्ह्यासाठी रायगड जिल्ह्यातील शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय असेल.
९) महाराष्ट्रातील पालघर जिल्हा वगळता प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र अभ्यासकेंद्र आहे. प्रवेशार्थीने आपल्या शाळेच्या जिल्ह्याचाच अभ्यासकेंद्र म्हणून विचार करणे अनिवार्य आहे. पालघर जिल्ह्यातील प्रवेशार्थिनी ठाणे जिल्ह्यातूनच अर्ज भरणे अपेक्षित आहे.
१०) एखाद्या जिल्ह्याच्या जागा प्रवेश अर्जांअभावी रिक्त राहिल्यास त्या विभागातील उर्वरित जिल्ह्यांच्या संबंधित प्रवर्गातील सर्व उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्तेनुसार संबंधित प्रवर्गातील उर्वरित जागा नव्याने तयार केलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या जिल्ह्यातच अतिरिक्त जागा म्हणून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. हे करताना त्या जिल्ह्यातील जागा ५० पेक्षा जास्त होणार नाही. याचा विचार करण्यात येईल.
११) दिव्यांगासाठी ५% म्हणजे एकूण ७५ जागा भरण्यात येतील. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला दोन/तीन जागा दिव्यांग विद्यार्थी प्रवेश कार्यपद्धतीनुसार गुणवत्ता यादीचा विचार करून भरण्यात येतील. ज्या जिल्ह्यात दिव्यांगांचे अर्ज जास्त असतील त्यातील पाच जिल्ह्यांना दिव्यागांच्या तीन जागा देण्यात येतील.
१२) प्रवेशासंदर्भातील सर्व सूचना http://ycmou.digitaluniversity.ac' या वेबसाईटवर प्रकाशि करण्यात येतील. प्रवेशार्थीने त्या पाहून त्यानुसार कृती करणे प्रवेशार्थीची जबाबदारी असेल.
१३) प्रवेशांनंतर विद्यापीठाकडून बी.एड. शिक्षणक्रम संरचना, अभ्यासविषयक साहित्य किंवा अभ्यासकेंद्रात कोणत्याही कारणास्तव बदल करण्यात आला तर तो प्रवेशार्थीला बंधनकारक असेल.
(महत्त्वाचे - या शिक्षणक्रमाला दिला जाणारा प्रवेश केवळ गुणवत्तेनुसार व नियमानुसार दिला जातो. अन्य कोणताही मार्ग कोणी सूचित केल्यास मा. कुलसचिव यांच्याकडे लेखी तक्रार करावी.)
८. शिक्षणक्रम प्रवेश पात्रता
किमान पात्रता
(८.१) यू.जी.सी. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी. (८.२) पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५० % (४९.५ ते ५० टक्क्यांपर्यंतचे गुण) व मागासवर्गीय उमेदवारांना किमान ४५ % (४४.५ ते ४५ टक्क्यांपर्यंतचे गुण) गुण असणे अनिवार्य आहे. (महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर स्केल लागू केला आहे अशा प्रवेशेच्छुना पदवी / पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट नाही, मात्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)
(८.३) डी.एड./डी.टी.एड. / क्राफ्ट टीचर डिप्लोमा हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्णवेळ / अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान दोन वर्षांचा (अर्धवेळ असल्यास ४ वर्षे) अनुभव असलेल्या अध्यापकांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळेल.
(८.४) प्रवेशासाठी किमान दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य असेल. पूर्णवेळ / अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल, असे शाळाप्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
९. प्रवेश अपात्रता
पुढील प्रकारचे अर्ज अपात्र ठरतात. तशी आवेदनपत्रे प्राप्त झाल्यास ती रद्द करण्यात येतील व उमेद्वारास याबाबत कळविले जाणार नाही.
९.१) ज्यांच्या सेवा आदेशात प्राथमिक शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाही.
९.२) सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरणारे ९. ३) अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रवेश अर्ज
९. ४) सध्या सेवेत नसलेले शिक्षक
९.५) तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक.
९. ६) यू.जी.सी. मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे पदवीधारक.
९.७) माध्यमिक/ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक / प्रयोगशाळा सहायक / कनिष्ठ सहायक / लिपिक, ग्रंथपाल, इत्यादी.
९.८) पदवी वर्षाच्या अंतिम परीक्षेस बसलेले, परंतु निकाल न लागल्यामुळे पदवी परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक.
९. ९) बालवाडीत शिकविणारे शिक्षक
९.१०) तांत्रिक विद्यालये, कृषी विद्यालये व तत्सम अन्य विद्यालये, एम.सी. व्ही. सी. निदेशक (Instructor) हे प्रवेशासाठी पात्र नाहीत.
९.११) प्रवेश अर्जावर मुख्याध्यापकाची सही नसणारे तसेच सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न जोडणारे शिक्षक प्रवेशास अपात्र ठरतील. मात्र मुख्याध्यापकच स्वतः उमेदवार असेल, तर संस्थेचे सचिव वा शिक्षणाधिकारी यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
९.१२) मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेले विद्यार्थी अपात्र ठरतील.
९.१३) राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रमाणपत्र / ना सायस्तर नसल्याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी मुदतीत सादर करू न शकणारे उमेदवार राखीव प्रवर्गातून प्रवेशास अपात्र ठरतील.
१०) प्रवेश अर्ज कसा भरावा?
प्रवेशार्थीने बी. एड. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. त्यामुळे माहिती पुस्तिका बारकाईने वाचून मगच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्ज भरतेवेळी प्रवेशार्थी राखीव प्रवर्गातील असेल तर जात प्रमाणपत्र, ना सायस्तर (Non Crymilyer), जात पडताळणी दाखला इ. आरक्षणा संदर्भातील सर्व कागदपत्रे प्रवेशार्थीजवळ असणे आवश्यक आहे. नेट बँकिंगद्वारे प्रोसेसिंग शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला प्रवेश अर्ज यशस्वीपणे भरला गेल्याचा संदेश येईल. ज्या प्रवेशार्थीला अर्ज यशस्वीपणे भरल्याचा संदेश येईल तेवढेच अर्ज प्रवेशासाठीच्या प्रक्रियेत विचाराधीन असतील, याची नोंद घ्यावी. प्रवेश पात्रतेच्या माहितीत प्रवेशार्थीने काही चूक केल्यास सदर उमेदवार प्रवेशेच्छुच्या यादीत नसेल. तसेच प्रवेश अर्ज भरतेवेळी गुणवत्ता यादीवर परिणाम करणा-या घटकांबाबत उमेदवाराने केलेली चूक, अपूर्ण माहिती व पुरविलेली खोटी माहिती उमेदवारास प्रवेशप्रक्रियेतून बाद करू शकते. तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याची तक्रार विद्यापीठाला कधीही प्राप्त झाली व त्या तक्रारीत तथ्य आढळल्यास सदर प्रवेशार्थीचा प्रवेश रद्द होऊन शुल्कही परत केले जाणार नाही. तसेच संबंधित उमेदवारावर शासन नियमानुसार FIR दाखल केला जाईल याचीही नोंद घ्यावी. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी व भरलेला अर्ज बरोबर आहे का? ते तपासण्याची जबाबदारी पूर्णतः प्रवेशेच्छुची आहे.
( १०.१) बी. एड. प्रवेशासाठी आपणाला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. ऑनलाईन भरलेल्या संगणकीय अर्जाच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यामुळे ऑनलाईन अर्ज बिनचूक भरणे आवश्यक आहे.
(१०.२) ऑनलाईन संगणक अर्ज कोठेही जमा करू नये, विभागीय केंद्रावर प्रत्यक्ष प्रवेश अर्ज पडताळणी करते वेळी सदर अर्ज व मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सोबत आणावीत.
(१०.३) संगणक अर्जात लिहिलेला अनुभव, पदवी / पदव्युत्तर पदवीचे गुण व श्रेणी आणि प्रवर्गाच्या आरक्षणाआधारेच प्रवेश अर्ज पडताळणी यादी निश्चित होते. प्रवेश पडताळणी यादी प्रसिद्ध करणेपुर्वी प्रवेशेच्छुना एकदा आपल्या भरलेल्या प्रवेश अर्जातील त्रुटी दुर करण्याची संधी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर देण्यात येते. त्यानंतर कोणत्याही स्वरूपाची तक्रार (ऑब्जेक्शन) विचारात घेतले जात नाही. विभागीय केंद्रावर प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीची पडताळणी करूनच गुणवत्ता यादीनुसार प्रवेश कायम करण्यात येतो. प्रवेशानंतर प्रवेशार्थीने दिलेली माहिती वा कागदपत्रे खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास,
सदर प्रवेशार्थीचा प्रवेश रद्द करून शुल्कही परत केले जात नाही. तसेच त्यावर फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येतो याची नोंद घ्यावी.
( १०.४) शिक्षक म्हणून अनुभव लिहितांना तो दि. ३० एप्रिल २०२३ पर्यंतचा नोंदवावा. संगणक अर्जावर केवळ तुमच्या एकूण सेवा कालावधीची (पुरावे सादर करू शकत असलेल्या) नोंद करावी. अनुभवाची नोंद करतांना उमेदवाराने नोकरीसंदर्भात सुरुवातीपासून आपणाकडे उपलब्ध असलेल्या पुराव्याप्रमाणे नोंद करावी. अनुभवाचा पुरावा म्हणून सेवेचे प्रमाणपत्र हे दस्तऐवज मान्य करण्यात येत नाही. ज्या सेवेचे पुरावे उदा. सेवा पुस्तिकेतील नोंद, सेवा ऑर्डर इ. उमेदवाराकडे नाहीत त्याची नोंद संगणकीय अर्जातील अनुभव नोंद तक्त्यात करू नये.
(१०.५) पूर्वीची सेवा अर्धवेळ असल्यास अनुभव नोंद तक्त्यात अनुभव नोंदविताना तसा स्पष्ट उल्लेख करावा. यासंदर्भात 'शिक्षणक्रम प्रवेश पात्रता मुद्दा क्र.८.३ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
(१९०.६) संगणक प्रवेश अर्जावरील 'जिल्हा' या ठिकाणी तुम्ही ज्या शाळेत सेवेत असाल त्या शाळेचा जिल्हा नोंदवावा. उमेदवाराची शाळा ज्या जिल्ह्यात असेल त्याच जिल्ह्यात उमेदवाराला प्रवेश घेता येतो. बी.एड.चे प्रवेश हे जिल्हानिहाय तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार करण्यात येतात. (१०.७) उमेदवाराने ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीचे पुरावे कागदपत्र पडताळणी वेळी सदर समितीला संबंधितांनी सादर करणे अनिवार्य असते.
( १०.८) अर्जदाराची कागदपत्र पडताळणी गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी निवड झाल्यास उमेदवाराने आपण online अर्जात भरलेल्या सर्व माहितीचा पुरावा देणारे तसेच सेवा सत्यता पडताळणीसाठीची प्रमाणित कागदपत्रे विभागीय केंद्रावर होणाऱ्या कागदपत्र पडताळणी साठी सोबत आणावीत. ती न आणल्यास उमेदवाराची कागदपत्र पडताळणी होणार नाही व संबंधित उमेदवार प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडेल याची नोंद घ्यावी.
क) मूळ प्रवेश अर्ज व ऑनलाईन संगणकीय अर्जाची प्रत आणि डी. एड. / डी.टी.एड./ क्राफ्ट टीचर डिप्लोमा उत्तीर्णतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
ख) शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती.
ग) प्रवेश अर्जात नोंद केल्याप्रमाणे प्रत्येक विद्यालयातील सुरुवातीपासून पुढील सर्व नेमणुकीच्या आदेशांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती, तसेच अनुभवाचे मूळ प्रमाणपत्र. घ) मागासवर्गीय असल्यास पुढे नमूद केल्याप्रमाणे मूळ प्रत व प्रमाणित सत्यप्रत.
अनुसूचित जाती (एस.सी.)
जातीचा दाखला
अनुसूचित जमाती (एस.टी.) जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र विमुक्त जमाती / भटक्या जाती / इतर मागासवर्गीय / विशेष मागासवर्गीय (VJ/NT/OBC/SBC)_जातीचा दाखला, ऑनलाईन संगणकीय अर्जात नमूद केलेल्या नावाचे अर्जावर असलेल्या नावाचे वैध कालावधीचे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र आवश्यक. ( आरक्षण शासन निर्णया नुसार बदल होऊ शकतात.)
ङ) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी त्यांचे उत्पन्न संबंधित वर्षात
आठ लाखापेक्षा कमी असल्याचा संबंधित अधिकाऱ्याचा प्रमाणित दाखला. च) जन्मतारखेचा पुरावा दर्शविणारी कोणत्याही प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.
छ) सर्व सेवेचे नेमणूक आदेश, शिक्षणाधिकारी / शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा पदमान्यता पत्राच्या सुरुवातीपासूनच्या सर्व साक्षांकित प्रती शाळा मान्यतापत्र. ज) मेंटार (वरिष्ठ शिक्षक) मान्यता प्रमाणपत्र.
झ) शाळा अनुदानित असेल तर वर्षनिहाय शाळा तपासणी अहवालाच्या साक्षांकित प्रती. ञ) सेवापुस्तिकेतील संबंधित नोंदी. (संपूर्ण सेवापुस्तिकेची साक्षांकित केलेली फोटोकॉपी) ट) नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा म्हणून राजपत्र.
ठ) सामाजिक आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांना
दिव्यांग : किमान ४० % दिव्यांग असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र.
प्रकल्पग्रस्त जिल्हा पुनर्वसन अधिकारी / सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे
आवश्यक.
आपत्तीग्रस्त: उपविभागीय अधिकारी / तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक.
• स्वातंत्र्यसैनिक पाल्य : पत्नी / मुलगा / अविवाहित मुलगी यांनी स्वातंत्र्यसैनिकाच्या ओळखपत्राची प्रत व पाल्याच्या नातेसंबंधाचा पुरावा. आजी / माजी सैनिक पाल्य : सैनिकाची पत्नी / मुलगा / अविवाहित मुलगी यांना जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक. नातेसंबंधाचा पुरावा आवश्यक, डिस्चार्ज 'पुस्तक आवश्यक.
विधवा : महानगरपालिका / नगरपालिका / ग्रामपंचायत यांच्याकडून प्राप्त झालेले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
घटस्फोटिता : विवाहनोंदणी दाखला किंवा न्यायालयाचे घटस्फोटाबाबतचे आदेश किंवा मुस्लीम महिलांच्या बाबतीत नियमाप्रमाणे निकाह लावणारे काझी / इमामांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र. ते प्रमाणपत्र नोटरी करून मराठी भाषेत भाषांतर करून आणणे आवश्यक.
• गोवा बेळगाव बिदर : हा मराठी भाषिक प्रदेश असल्याने या उमेदवारांनी नियुक्ती आदेश व अनुभवाचे दाखले हे मराठी / हिंदी / इंग्रजीत आणावे व त्यावर संबंधित अधिकारी / मुख्याध्यापकाची सही व शिक्का आणणे अनिवार्य असेल.
मुलाखतीच्या वेळी वरील मूळ व साक्षांकित ( Attested) प्रमाणपत्रांआधारे उमेदवाराच्या प्रवेश अर्जातील माहितीची सत्यता पडताळून पाहण्यात येईल. त्यामुळे उपरोक्त आवश्यक ती कागदपत्रे उमेदवाराजवळ जवळ नसल्यास प्रवेश दिला जाणार नाही.
(१०.०९) संगणक अर्जातून प्राप्त माहितीच्या आधारे प्रवेश अर्ज पडताळणी यादी तयार करण्यात येईल. त्या यादीतील उमेदवारांनी प्रवेशासंदर्भात आपल्या विभागीय केंद्रावर कागदपत्र पडताळणी साठी नियोजित वेळेत सर्व मूळ कागद पत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य असेल.
ङ) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी त्यांचे उत्पन्न संबंधित वर्षात
आठ लाखापेक्षा कमी असल्याचा संबंधित अधिकाऱ्याचा प्रमाणित दाखला. च) जन्मतारखेचा पुरावा दर्शविणारी कोणत्याही प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.
छ) सर्व सेवेचे नेमणूक आदेश, शिक्षणाधिकारी / शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा पदमान्यता पत्राच्या सुरुवातीपासूनच्या सर्व साक्षांकित प्रती शाळा मान्यतापत्र. ज) मेंटार (वरिष्ठ शिक्षक) मान्यता प्रमाणपत्र.
झ) शाळा अनुदानित असेल तर वर्षनिहाय शाळा तपासणी अहवालाच्या साक्षांकित प्रती. ञ) सेवापुस्तिकेतील संबंधित नोंदी. (संपूर्ण सेवापुस्तिकेची साक्षांकित केलेली फोटोकॉपी) ट) नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा म्हणून राजपत्र.
ठ) सामाजिक आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांना
दिव्यांग : किमान ४० % दिव्यांग असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र.
प्रकल्पग्रस्त जिल्हा पुनर्वसन अधिकारी / सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे
आवश्यक.
आपत्तीग्रस्त: उपविभागीय अधिकारी / तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक.
• स्वातंत्र्यसैनिक पाल्य : पत्नी / मुलगा / अविवाहित मुलगी यांनी स्वातंत्र्यसैनिकाच्या ओळखपत्राची प्रत व पाल्याच्या नातेसंबंधाचा पुरावा. आजी / माजी सैनिक पाल्य : सैनिकाची पत्नी / मुलगा / अविवाहित मुलगी यांना जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक. नातेसंबंधाचा पुरावा आवश्यक, डिस्चार्ज 'पुस्तक आवश्यक.
विधवा : महानगरपालिका / नगरपालिका / ग्रामपंचायत यांच्याकडून प्राप्त झालेले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
घटस्फोटिता : विवाहनोंदणी दाखला किंवा न्यायालयाचे घटस्फोटाबाबतचे आदेश किंवा मुस्लीम महिलांच्या बाबतीत नियमाप्रमाणे निकाह लावणारे काझी / इमामांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र. ते प्रमाणपत्र नोटरी करून मराठी भाषेत भाषांतर करून आणणे आवश्यक.
• गोवा बेळगाव बिदर : हा मराठी भाषिक प्रदेश असल्याने या उमेदवारांनी नियुक्ती आदेश व अनुभवाचे दाखले हे मराठी / हिंदी / इंग्रजीत आणावे व त्यावर संबंधित अधिकारी / मुख्याध्यापकाची सही व शिक्का आणणे अनिवार्य असेल.
मुलाखतीच्या वेळी वरील मूळ व साक्षांकित ( Attested) प्रमाणपत्रांआधारे उमेदवाराच्या प्रवेश अर्जातील माहितीची सत्यता पडताळून पाहण्यात येईल. त्यामुळे उपरोक्त आवश्यक ती कागदपत्रे उमेदवाराजवळ जवळ नसल्यास प्रवेश दिला जाणार नाही.
(१०.०९) संगणक अर्जातून प्राप्त माहितीच्या आधारे प्रवेश अर्ज पडताळणी यादी तयार करण्यात येईल. त्या यादीतील उमेदवारांनी प्रवेशासंदर्भात आपल्या विभागीय केंद्रावर कागदपत्र पडताळणी साठी नियोजित वेळेत सर्व मूळ कागद पत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य असेल.
नियोजित वेळेत अंतिम करणे अपेक्षित असेल. अर्थात विद्यापीठाच्या धोरणानुसार त्यात होणारा सर्व बदल उमेदवारांना बंधनकारक असेल. त्यासंदर्भात विद्यापीठ संकेतस्थळावर प्रवेश गुणवत्तायादी सोबत सूचना देते. प्रवेश निवड यादी वेळापत्रकासह वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येते. ती बघणे उमेदवाराची जबाबदारी असेल. नियोजित वेळेत प्रवेश न घेणाऱ्या उमेदवाराच्या जागी त्याच प्रवर्गातील प्रवेश निवड यादीतील पुढील उमेदवार प्रवेश अर्ज पडताळणीसह पुढील फेरीत भरण्यात येतील. निवड यादी केवळ विद्यापीठ संकेतस्थळावरच टाकण्यात येईल.
लक्षात ठेवा - विभागीय केंद्रावर प्रवेश अर्ज पडताळणीसाठी जाताना मुद्दा क्र. १०.८ मध्ये नमूद | केलेली तसेच प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीचा पुरावा देणारी सर्व मूळ कागदपत्रे उमेदवाराने आणणे बंधनकारक आहे. उमेदवाराजवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारेच त्याच्या अर्जाचे पडताळणी करून प्रवेश गुणवत्ता यादीत नाव समाविष्ट केले जाते. राखीव गटातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे शासनाने निर्धारित केलेली वैध कागदपत्रे असणे बंधनकारक असेल. कागदपत्र पडताळणी वेळी Online प्रवेश अर्जातील भरलेली माहिती व उमेदवाराजवळ उपलब्ध असलेले पुरावे यांची तपासणी करण्यात येते.
(१०.११) प्रवेश अर्ज पडताळणीनंतर निवड यादीत उमेदवाराचे नाव असल्यास उमेदवाराने नियोजित वेळी शुल्क भरण्यापूर्वी डी.यू. पोर्टलवरील प्रवेशार्थी माहितीचा (Othentification) फॉर्म भरणे अनिवार्य असेल. ( १०.१२) प्रत्येक जिल्ह्याला निर्धारित जागा आहेत. प्रवेश अर्जाअभावी त्या भरल्या न गेल्यास त्या विभागातील उर्वरित जिल्ह्यांच्या संबंधित प्रवर्गातील सर्व उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी तयारी करून गुणवत्तेनुसार संबंधित प्रवर्गातील उर्वरित जागा नव्याने तयार केलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या जिल्ह्यातच अतिरिक्त जागा म्हणून भरण्यात येतील. हे करताना त्या जिल्ह्यातील जागा ५० पेक्षा जास्त होणार नाही. याचा विचार करण्यात येईल.
(१०.१३) बी.एड. २०२३ - २५ शिक्षणक्रमाच्या प्रवेशासंदर्भात आपल्या काही तक्रारी असल्यास त्या b.ed_admission@ycmou.ac.in ह्याच ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. प्रवेशा संदर्भातील तक्रार अर्जाची विद्यापीठ पडताळणी करून योग्य तो निर्णय घेईल. मात्र प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आलेल्या तक्रार अर्जांवर विचार केला जाणार नाही.
या शिक्षणक्रमासाठीच्या निवड यादीबाबत उमेदवारांना केवळ विद्यापीठ | संकेतस्थळावरूनच कळवले जाईल. तसेच सदर याद्या विद्यापीठ संकेतस्थळावरूनच प्रसिद्ध | करण्यात येतील. तसा मेसेज उमेदवाराला प्रवेशासाठी भरलेल्या ऑनलाईन प्रवेश अर्जात नोंदविलेल्या मोबाईलवर पाठविण्यात येईल. बी. एड. प्रवेशासाठी विद्यापीठ संकेतस्थळ पाहण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल.
(१०.१४) या पुस्तिकेतील प्रवेश अर्ज व त्याची सहपत्रे उमेदवाराने ज्या शैक्षणिक तुकडीसाठी सादर असतील त्या तुकडीच्या प्रवेशासाठीच वैध असतील.
(१०.१५) संगणकीय अर्जात जिल्हा संकेतांकाची चुकीची नोंद केल्यास उमेदवाराचा प्रवेशासाठी विचार होणार नाही. यासाठी संगणकीय अर्जात उमेदवाराने आपली शाळा, शाळेचा तालुका व जिल्हा याची नोंद
अचूक करावी. बी.एड. प्रवेश याद्या जिल्हानिहाय असल्याने उमेदवाराच्या शाळेची निवड त्याचा तालुका वा जिल्हा चुकीचा नोंदविला तर प्रवेशार्थीचे अभ्यासकेंद्र बदलते. वेगळ्या जिल्ह्यात उमेदवाराला प्रवेश दिला जात नसल्याने सदर उमेदवाराचा दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश झाल्यास तो रद्द केला जातो व शुल्क ही परत केले जात नाही.
लक्षात ठेवा
उमेदवाराने या शिक्षणक्रमाला अभ्यासकेंद्रावर प्रवेश घेतल्यानंतर आपल्या online अर्जाची प्रिंट, प्रवेश शुल्काची ई-चलन पावती आपल्या
नोंदनिकृत मेल आयडीवर प्राप्त होईल. तसेच त्याची प्रत स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.
महत्वाचे
प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टण्यानुसार वेळोवेळी दिलेल्या कार्यवाही संदर्भातील सूचना विद्यापीठ संकेत स्थळावर पहाव्यात.
(११) निवड प्रक्रिया
(११.१) सदर शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार करताना केवळ ऑनलाईन संगणकीय अर्जात भरलेल्या माहितीचा विचार केला जातो. उदाहरणार्थ: सेवाज्येष्ठता, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि अतिरिक्त पदवीचे गुण इत्यादी. आरक्षणासंदर्भात संगणक अर्जातील माहिती व शासन नियमांचे पालन करण्यात येते.
(११.२) प्रवेश गुणवत्ता यादी करताना प्रथम अनुभवानुसार पायाभूत गुण देण्यात येतात. २०२३-२५ तुकडीसाठी सेवा अनुभव नोंदवण्याचा दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यंत असेल. प्रत्येक वर्षासाठी एक गुण असे एकूण जितक्या वर्षांचा अनुभव असेल तितके गुण मिळतील. एका वर्षापेक्षा कमी कालावधीचे गुण ठरविताना जर अनुभव सहा महिने किंवा अधिक असेल तर एक गुण धरण्यात येईल. त्यापेक्षा कमी महिन्यांच्या सेवेला गुण देण्यात येणार नाहीत. अर्धवेळ काम करणाऱ्या शिक्षकांची शिक्षणक्रम प्रवेश पात्रता मुद्यांअतर्गत दिल्याप्रमाणे विचारात घेतली जाईल. प्रवेशासाठी मराठीचे पुरेसे ज्ञान उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे, त्यासंदर्भात कोणाचीही तक्रार ऐकली जाणार नाही.
(११.३) शैक्षणिक पात्रता वर्ग/ श्रेणी निहाय गुणदान पद्धती -
अ) 'डी.एड./डी.टी.एड./ क्राफ्ट टीचर पदविका शिक्षणक्रम उत्तीर्णता' या शिक्षणक्रमाची अर्हता असल्याने संबंधित शिक्षणक्रम उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र प्रवेशाच्यावेळी सादर करणे अनिवार्य असेल. मात्र त्यास कोणतेही अतिरिक्त गुणदान नसेल.
ब) पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा पदवीनंतरची अतिरिक्त एक वर्षाची पदविका उत्तीर्ण असणाऱ्या अध्ययनार्थीना त्यात मिळालेल्या श्रेणीनुसार खालीलप्रमाणे गुण दिले जातात. मात्र त्यासाठी प्रवेशार्थीने त्यासंदर्भातील माहिती ऑनलाईन अर्जात संबंधित रकान्यात भरलेली असणे अनिवार्य असते.
(११.५ ) प्रवेश प्रक्रिया
प्रवेश अर्ज पडताळणी गुणवत्ता यादी तयार करताना यशस्वीपणे भरलेल्या Online अर्जांचाच विचार करण्यात येईल. विभागीय केंद्रावर कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यात प्रथमतः सामाजिक आरक्षण, खुला प्रवर्ग व नंतर राखीव जागांचे प्रवेश होतील. एखाद्या मागासवर्गीय घटकासाठी पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या जागा पुढील फेरीत नियमानुसार व गुणवत्तेनुसार इतर मागासवर्गीयांच्या यादीतून संक्रमित पध्दतीने भरण्यात येतील. त्यासाठी शासन नियमानुसार पुढीलप्रमाणे जागांचे संक्रमण असेल.
संदर्भ
गट ए - अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST)
गट बी - विमुक्त जाती (VJ-A ) व भटक्या जाती (NT-B)
गट सी
भटक्या जमाती (NT-C) व भटक्या जमाती ( NT-D ) इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांचा समावेश असेल.
शा.नि.क्र. टी.ई.एम.-२००६ / (३०६ / ०६) तांशी - १, दि. ६ जुलै २००६ ( अध्यादेश २००६ ची अधिसूचना). दिव्यांग / आजी-माजी सैनिक / प्रयोगशील शाळा / गोवा, बेळगाव व बिदर त्या त्या संवर्गातील किमान गुणा अखेर आरक्षित जागांवर पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त जागा संवर्गानुसार मुक्त समजण्यात येतील व त्या संवर्गातील मूळ गटास दिल्या जातील. त्यानंतरही राखीव प्रवर्गातून जागा शिल्लक राहिल्यास त्या सर्वसाधारण गटातून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. नविन शासन निर्णय (जी.आर.) निघाल्यास त्यानुसार यात बदल करण्यात येईल.
(११.६) प्रवेश गुणवत्ता यादीत जर समान गुण असतील तर प्रथम अनुभवाचा आणि नंतर वयानुसार ज्येष्ठता विचारात घेतली जाईल. जर वय समान असेल तर ज्यांनी पदवी अगोदर प्राप्त केली असेल त्यांना प्राधान्य मिळेल. त्यानंतरही समान गुण झाल्यास गुणवत्ताक्रम ठरविण्याचा अधिकार निवड समितीकडे राहील व तो अंतिम असेल.
(११.७) पदवीधर वेतनश्रेणीबाबत - पदवीधर वेतनश्रेणी म्हणजे चटोपाध्याय श्रेणी (स्केल), वरिष्ठ निवड श्रेणी (स्केल), मुख्याध्यापक श्रेणी (स्केल) नसून, ज्या प्राथमिक शिक्षकांना शासनाने प्रत्यक्ष पदवीधर वेतनश्रेणी देऊन पाच/सात वर्षांच्या आत बी.एड. शिक्षणक्रम पूर्ण करण्याची अट लेखी स्वरूपात घातलेली
उमेदवाराचीच असेल. त्यासंदर्भात कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. ५वी ते १० / १२ वी वर्ग असलेल्या माध्यमिक शाळेत डी. एड. स्केलवर कार्यरत अथवा माध्यमिक शिक्षक नियुक्ती असूनही पाचवी ते सातवी इयत्तांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना जर शासनाने प्राथमिक शिक्षकांची पदवीधर वेतनश्रेणी दिली असेल तर अशा व्यक्तींनी पदवीधर वेतनश्रेणी मिळाल्याची, तसेच ती श्रेणी मिळून किती वर्षे झालेली आहे त्याची नोंद संगणक अर्जावर करावी. पदवीधर वेतनश्रेणी प्राथमिक शिक्षकांना देण्यात येत असल्याने या योजनेचा लाभ घेणारे सर्व शिक्षक प्राथमिक स्तरात गणले जातील.
पुन्हा एकदा महत्त्वाचे शहरी, ग्रामीण, आदिवासी विभाग, अतिदुर्गम भाग राहणाऱ्या सर्व प्रवेशेच्छुकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना :- प्रवेश प्रक्रियेतील कोणतीही सूचना प्रवेशेच्छुकांना पोस्टाने कळविले जाणार नाही. त्यासाठी केवळ वेबसाईटचाच वापर करण्यात येईल. विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रवेशासाठी निवड झालेल्यांची यादी पाहायला मिळेल. जवळच्या सायबर कॅफेतून ती प्राप्त करता येईल. तुम्ही ती न पाहिल्यास त्यास उमेदवारच जबाबदार असाल. तसेच अशा उमेदवारांना नंतरच्या फेरीतही प्रवेश गुणवत्ता यादीत कागदपत्र पडताळणीसाठी निवड केली जाणार नाही.
(११.८) यादीमध्ये नाव आहे की नाही ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर कसे पाहाल ?
विद्यापीठाच्या Home page http://ycmou.digitalunivrsity.ac ला log in व्हा. प्रवेशास पात्र उमेदवारांच्या याद्यांसंबंधी सूचना त्यावर Click करा. त्यानंतर पुढे कसे जावे याबाबत सूचना उमेदवारास बघायला मिळतील. त्या वाचून त्याप्रमाणे कृती करा म्हणजे आपण आपल्या नावापर्यंत पोहोचाल. (११.८) बी. एड. प्रवेशानंतर उमेदवाराने प्रवेश अर्जात नोंदवलेल्या मोबाईलवर Password येईल. त्यावर उमेदवाराने Profile तपासून पाहावे. अभ्यासक्रम निवड, नावाच्या संदर्भात जर काही त्रुटी असतील तर तातडीने विभागीय केंद्रावर संपर्क साधावा. प्रोफाईल तपासणीसाठी दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची माहिती / अभ्यासक्रम बदल होत नाही याची नोंद घ्यावी.
(११.९) बी. एड. ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला बी. एड.च्या द्वितीय वर्षासाठी पुन्हा Online प्रवेश- अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. दुसऱ्या वर्षी आपला बी. एड. प्रवेश पुन्हा निश्चित न करणारे विद्यार्थी दुसऱ्या वर्षाची अंतिम परीक्षा देण्यास अपात्र ठरतात, याची कृपया नोंद घ्यावी.
JG01084624
उत्तर द्याहटवा2023017000643774
उत्तर द्याहटवा2023017000643774
उत्तर द्याहटवा2023017000643774
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .