जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत
लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.
संदर्भ :- १. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. आंजिब ४८२०/प्र.क्र.२९१/आस्था- १४, दि.०७.०४.२०२१
२. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. आंजिब २०२३/प्र.क्र.११७/आस्था- १४ दि.२३.०५.२०२३
३. शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४ / टीएनटी-१, दि.२१.०६.२०२३
४. शासनाचे समक्रमांक दि.२३.०८.२०२३ रोजीचे पत्र.
उपरोक्त विषयांकित सर्व शासन निर्णयांचे व पत्राचे कृपया अवलोकन व्हावे.
संदर्भ क्र. १ येथील दि.०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या धोरणानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी सन २०२२ ची आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबविण्यात आलेली आहे. तसेच दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे.
तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील दि. २१.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १ मध्ये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, असे नमूद केले आहे. त्याअनुषंगाने, मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.३१.०८.२०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार आपल्या जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची दि.०१.०९.२०२३ रोजी बिंदुनामावली निहाय रिक्त पदांची माहिती दि.०४.०९.२०२३ पर्यंत https://ott.mahardd.in या पोर्टलवर अद्यावत करण्यात यावी.
तसेच ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलसाठी लॉगिन आयडी उपलब्ध करुन देण्याकरिता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे नाव, मोबाईल नंबर व ईमेल आयडी याबाबत माहिती संबंधित जिल्हा परिषदांनी Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, Pune यांना दि. ०४.०९.२०२३ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करुन द्यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
परिपत्रक download साठी येथे क्लिक करा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .