राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) येथे
राज्य मूल्यमापन कक्ष अंतर्गत प्रतिनियुक्ती / कंत्राटी पदांच्या निवड प्रक्रियेबाबत.
उपरोक्त विषयान्वये, STARS (Strengthening Teaching & Learning and Results for States) प्रकल्प अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे राज्य मूल्यमापन कक्ष स्थापन करणेबाबत संदर्भीय शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्य मूल्यमापन कक्षांतर्गत विविध पदांवर नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर पदभरती प्रतिनियुक्ती अथवा कंत्राटी तत्त्वावर करण्यात येणार आहेत. त्यानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन आवेदन पत्रे मागविण्यात येत आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदनपत्र https://forms.gle/nZ6mQXvEYDqHp9Lv7
या लिंकद्वारे सादर करावीत. आवेदनपत्र ऑनलाईन सादर करण्याचा कालावधी दि.22 जुलै, 2023 ते 31 जुलै, 2023 राहील.
सदर पत्र व लिंक परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
राज्य मूल्यमापन कक्षातील कर्मचारी यांची निवड व नियुक्तीसाठी अटी व शर्ती
: प्रतिनियुक्तीद्वारे निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारास पुढील अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
1. प्रतिनियुक्ती स्वरूपातून नियुक्त करावयाच्या पदांसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे शाळांतील शिक्षक / शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांचेमधून मुलाखत अथवा अन्य निवड प्रक्रिया राबवून उमेदवारांची निवड करण्यात येईल.
2. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आवेदनपत्रांची छाननी करुन, उमेदवारांना पात्रता पडताळणी व मुलाखतीचे नियोजन कळविणेत येईल.
3. प्रतिनियुक्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील (जि.प./ न.प./ म.न.पा.) प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, माध्यमिक शिक्षक तसेच केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी / उपशिक्षणाधिकारी / अधिव्याख्याता / जेष्ठ अधिव्याख्याता, शिक्षणाधिकारी यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.
4. प्रतिनियुक्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सेवा निवृत्तीस दोन वर्षे शिल्लक असल्यास प्रतिनियुक्तीस अर्ज करता येणार नाही.
5. प्रतिनियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारास जिल्हास्तरावर, विभागस्तरावर व राज्यस्तरावर विविध स्वरुपाचे काम करण्याचा अनुभव असावा.
6. उमेदवारास संगणक ज्ञान असणे, मराठी व इंग्रजी टायपिंग करता येणे आवश्यक आहे.
7. सदरची निवड ही राज्यशासनाच्या प्रतिनियुक्ती नेमणुकी संदर्भातील प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येईल. मात्र प्रतिनियुक्तीचा कालावधी STARS प्रकल्प सुरु असे पर्यंत असेल अथवा STARS प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर शासनाने राज्य मूल्यमापन कक्ष सुरु ठेवण्यास मुदतवाढ दिल्यास प्रतिनियुक्ती सुरु राहू शकेल.
8. प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये कोणताही विशेष भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
9. प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन व भत्ते मूळ आस्थापनेवरुन काढण्यात येतील.
10. सुरुवातीस प्रतिनियुक्ती कालावधी हा एक वर्षाचा असेल त्यानंतर मूल्यमापन करण्यात येईल. मूल्यमापनातील प्रतिसादानुसार पुढील नियुक्ती कालावधी वाढविण्यात येईल.
11. विषयतज्ज्ञ या पदावर प्रतिनियुक्तीसाठी निवड झाल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दिलेल्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या पूर्ण करणे बंधनकारक राहील.
12. प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये संबंधितांचे काम समाधानकारक नसल्यास अथवा संस्थेच्या प्रतिमेस / हितास बाधा पोहोचेल असे गैरवर्तन केलेले निदर्शनास आल्यास त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून मूळ आस्थापनेवर रुजू व्हावे लागेल. तसेच अशा प्रसंगी प्रकरणपरत्वे आवश्यकतेनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
13. प्रतिनियुक्तीने निवड झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८९ मधील तरतूदीनुसार देय ठरणाऱ्या नैमत्तिक, अर्जित व वैद्यकीय रजा अनुज्ञेय राहतील. प्रतिनियुक्ती कालावधीत शिक्षकांना दीर्घ मुदत सुटी लागू असणार नाही.
14. प्रतिनियुक्तीने अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कार्यरत आस्थापनेवरील संनियंत्रण अधिकारी / सक्षम प्राधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र मुलाखतीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
15. प्रतिनियुक्तीने विषयतज्ज्ञ या पदावर निवड झाल्यानंतर रुजू होताना मूळ आस्थापनेकडील कार्यमुक्ती प्रमाणपत्र व विहित नमुन्यामध्ये बंधपत्र भरुन देणे बंधनकारक राहील.
कंत्राटी पद्धत्तीने निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारास पुढील अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
1. कंत्राटी तत्तवावर नियुक्ती करावयाच्या पदांसाठी ऑनलाईन स्वरुपात आवेदन पत्रे मागवून उमेदवाराची मुलाखत अथवा अन्य निवड प्रक्रिया करून उमेदवारांची निवड करण्यात येईल.
2. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आवेदनपत्रांची छाननी करुन, उमेदवारांना पात्रता पडताळणी व मुलाखतीचे नियोजन कळविणेत येईल.
3. कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी या पत्रामध्ये विहित अटींची पूर्तता करणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरता येईल.
4. कंत्राटी स्वरुपात निवड ही ११ महिन्यांसाठी असेल.
5. कंत्राटी सेवेचा ११ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर त्या पदावर पुढील सेवेच्या कालावधीसाठी कोणताही हक्क असणार नाही. तसेच ११ महिन्यांच्या आत STARS प्रकल्पाची मुदत संपल्यास सेवा समाप्त करण्यात येईल अथवा STARS प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर शासनाने राज्य मूल्यमापन कक्ष सुरु ठेवण्यास मुदतवाढ दिल्यास ११ महिन्यापर्यंत सेवा सुरु राहू शकेल.
6. ११ महिन्याचा सेवा कालावधी पूर्ण झालेनंतर संबंधित कर्मचाऱ्याचे काम समाधानकारक असल्यास, १ दिवसाचा खंड देऊन (खंडाच्या दिवशी रविवार वा सार्वजनिक सुटी आल्यास पुढील दिवस) वेळोवेळी (प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अथवा राज्य मूल्यमापन कक्षास शासन मान्यता असेपर्यंत) पुढील ११ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जाऊ शकेल.
7. उमेदवारास संगणक ज्ञान असणे, मराठी व इंग्रजी टायपिंग करता येणे आवश्यक आहे.
8. मूल्यमापन तज्ज्ञ यांचे साठी दरमहा रुपये ६०,०००/- एकत्रित मानधन देय असेल.
9. मानसोपचार तज्ज्ञ यांचे साठी दरमहा रुपये ६०,०००/- एकत्रित मानधन देय असेल.
पदे
पदांची कार्ये व अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .