यु-डायस प्लस सन २०२१ - २२ व २०२२ - २३ ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदविलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची माहितीतील तफावतीबाबत.
MPSP चे राज्य प्रकल्प संचालक श्री कैलास पगारे यांनी दि २४ जुलै २०२३ च्या परिपत्रकानुसार असे सूचित केले आहे कि......
(तसेच MPSP च्या सहायक संचालक सरोज जगताप यांनी दि २१ जुलै २०२३ च्या परिपत्रकानुसार असे सूचित केले आहे कि)
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सन २०२१ - २२ व २०२२ - २३ या वर्षातील नोंदविलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत पुढील प्रमाणे तफावत दिसून आली आहे.
विद्यार्थ्यांची नोंद यु-डायस प्लस प्रणालीमध्ये करणेबाबत या कार्यालयाकडून वारंवार पत्र व्यवहार केला असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तरी देखील अद्याप विद्यार्थ्यांची नोंद १००% पूर्ण झालेली नाही. सदर बाब अत्यंत गंभीर असून याचा परिणाम पुढील वर्षाच्या समग्र शिक्षा योजनेच्या वार्षिक नियोजन व अंदाज पत्रकावर होईल.
तरी आपणास कळविण्यात येते की, शाळानिहाय विद्यार्थी संख्येची खात्री करून राहिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंद करावी, जेणे करून एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. सोबत - जिल्हानिहाय तुलनात्मक अहवाल.
अधिक माहिती साठी परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .