SCERT आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ I Quality Educational Video Production Competition 2023 for Teachers organized by SCERT

SCERT आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३


आमच्या whats app group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

स्पर्धेसाठी ऑनलाईन नावनोंदणी लिंक

https://scertmaha.ac.in/vcomp2023/ (LINK)



शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ मुदतवाढ करिता नावनोंदणी व व्हिडीओ
अपलोड करणेबाबत scert ने परिपत्रक दि २४ नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित केले आहे. या परिपत्रकानुसार खालीलप्रमाणे (३१ डिसेंबर पर्यंत ) मुदतवाढ दिलेली आहे. परिपत्रक download साठी येथे click करा.





प्रस्तुत स्पर्धेतील अटींमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत असून उर्वरित अटी जश्याच्या तश्याच लागू राहतील.

१. स्पर्धेमध्ये भाग घेण्याची (व्हिडीओसह नावनोंदणी) मुदत दिनांक १५/११/२०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

२. उमेदवार एकापेक्षा अधिक गटासाठी / इयत्तेसाठी नावनोंदणी करून भाग घेता येईल. उदा. प्राथमिक स्तरावरील उमेदवार माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ अध्यापक विद्यालय स्तरावर ही अर्ज सादर करू शकतात.

३. राज्यातील सर्व शिक्षण मंडळाचे (State Board/ CBSE/ICSE/IB/other ), सर्व व्यवस्थापनाचे (जि. प./म.न.पा./न.पा./शासकीय/अनुदानित/विनानुदानित/कायम विनानुदानित/ स्वयंअर्थसाहाय्यीत) / सर्व माध्यमाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक प्रस्तुत स्पर्धेत भाग घेवू शकतात.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ११ मे २०२३ नुसार शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी; यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक प्रशिक्षक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुली स्पर्धा २०२३-२४ चे शासनामार्फत आयोजन करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचे नामांकन प्रक्रिया दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु झालेली आहे.

सदरच्या चळवळीच्या माध्यमातून संकलित करण्यात येणारे ई-साहित्य हे राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे साठी संदर्भीय तसेच अध्ययन पूरक ठरणार आहेत. सदरच्या खुल्या स्पर्धेचे निकप, गटनिहाय विषय व पारितोपिकाबाबत सविस्तर तपशील https://tinyurl.com/bfvwja5d या दि. ११/०५/२०२३ चे शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे. दिनांक १५ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत https://scertmaha.ac.in/vcomp2023/ या लिंकवर क्लिक करून सदरच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना या प्रणालीवर आपले नामांकन करता येईल तसेच या प्रणालीवर स्पर्धेबाबतचा सर्व तपशील व निकष उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपामध्ये; तर विजेत्या उमेदवारांना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या स्पर्धेबाबतच्या सविस्तर निकप देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत लवकरच निर्गमित केले जातील. तरी जास्तीत जास्त शिक्षक/ मुख्याध्यापक/ शिक्षक प्रशिक्षक यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ मुदतवाढ करिता नावनोंदणी व व्हिडीओ अपलोड करणेबाबत scert ने परिपत्रक दि 12 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केले आहे. या परिपत्रकानुसार........

दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ पासून शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ सुरु आहे, हे आपणास विदितच आहे. याबाबत या कार्यालयामार्फत वेळोवेळी ऑनलाई बैठकांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ देण्यात आली होती. संदर्भ क्रमांक ३ नुसार राज्यातील विविध शिक्षक व शिक्षक संघटनांमार्फत स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची मुदतवाढ करणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे.

उपरोक्त बाबींचा विचार करता मुदतीत प्राप्त झालेल्या व्हिडीओंची; गट, इयत्ता व विषयवार वर्गवारी पाहता; तसेच भविष्यात शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोणातून स्पर्धेची उपयुक्तता वाढविणे, स्पर्धात्मक वातावरण तयार करणे इत्यादी बाबी विचारात घेता; प्रस्तुत स्पर्धेबाबत सविस्तर सूचना देण्याचे व स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करून प्रस्तुत स्पर्धेबाबत खालील निर्णय घेण्यात येत आहेत.

१) स्पर्धेमध्ये भाग घेण्याची (व्हिडीओसह नावनोंदणी) मुदत दिनांक १५/१1/२०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

२) विद्यालयांची संख्या विचारात घेता इयत्ता ११ वी - १२ वी गट व अध्यापक विद्यालय गट या दोन्ही गटाचे मूल्यांकन तालुका ऐवजी जिल्हा स्तरावरून सुरु होईल. त्यामुळे प्रस्तुत गटातील उमेदवार फक्त जिल्हा स्तरापासून पुढील प्रक्रियेस पात्र असतील.

३) इयत्ता ११ वी १२ वी गटामध्ये भाग घेण्यासाठी या शाखानिहाय राज्य शिक्षण मंडळाचे सर्व विषय समाविष्ट करण्यात येत आहेत.

४) तालुका समन्वयक स्पर्धेसाठी तालुका समन्वयक म्हणून प्रत्येक तालुक्यासाठी एका विस्तार अधिकाऱ्याची नेमणूक करावी. त्यांनी केंद्रातून जास्तीत जास्त शिक्षक या स्पर्धेत सहभागी होतील याबाबत केंद्रप्रमुखांचा आढावा घ्यावा. तालुक्यातून प्रत्येक गटातील प्रत्येक इयत्तेतील, दिलेल्या विषयासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ निर्मिती होऊन त्यामधून त्या-त्या इयत्तेच्या सर्व अध्ययन निष्पत्ती साध्य होतील व भविष्यात तालुक्याच्या शैक्षणिक उपयोगासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ तयार होतील याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. यासाठी केंद्रप्रमुख यांचे स्तरावर बैठका घेऊन योग्य ते नियोजन करण्यात यावे. याबाबत तालुका समन्वयकांनी आवश्यकतेनुसार त्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व डायट संपर्क अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

५) केंद्रप्रमुख - केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्राची ऑनलाईन / ऑफलाईन बैठक घेऊन अधिकाधिक शिक्षक सदर स्पर्धेत भाग घेतील हे पहावे. तसेच तालुका समन्वयकाशी चर्चा करून तालुक्याच्या गरजेनुसार स्पर्धा गटात इयत्तेनुसार, विषयानुसार आशय वैविध्य आणून व्हिडिओ स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षकांना व्हिडिओ निर्मितीसाठी आशय / अध्ययन निष्पत्ती निवडण्यास प्रोत्साहित करावे. तालुका समन्वयकाच्या मार्गदर्शनाखाली; विषयात व आशयात वैविध्य येण्यासाठी केंद्रप्रमुख आपल्या केंद्राचे नियोजन करू शकतील. याबाबत केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रात बैठक घेऊन योग्य त्या सूचना व प्रेरणा द्यावी.

६) विषय वैविध्य राखून जास्तीत जास्त व्हिडिओ बनविले जात आहेत याबाबत तालुका समन्वयक तालुक्याचा व केंद्रप्रमुख केंद्राचा दैनंदिन आढावा घेतील.

(७) स्पर्धात्मक वातावरण रहावे म्हणून प्रत्येक स्तरासाठी प्रत्येक तालुका/गटातील शाळा संख्येच्या किमान ३०% व्हिडिओ नोंदणी होणे गरजेचे आहे अन्यथा संबंधित गट स्पर्धेतून बाद ठरविला जाईल.

८) प्रस्तुत स्पर्धेत जास्तीत जास्त नोंदणी करणाऱ्या पहिल्या १० तालुक्यांना ( गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, डाएट संपर्क अधिकारी, विस्तार अधिकारी ०१ व केंद्रप्रमुख) व पहिल्या ३ ( प्राचार्य डाएट, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, आय. टी. विभागाचे वरिष्ठ अधिव्याख्याता - ०१) जिल्ह्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

९) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची एक संयुक्त बैठक (पत्र मिळाल्यापासून २ दिवसात) घेऊन याबाबत सविस्तर सूचना द्याव्यात.

१०) एखाद्या गटामध्ये व्हिडिओ मुल्यांकन करण्यासाठी विषयनिहाय विशेष तज्ज्ञता असलेले अतिरिक्त तज्ज्ञ परीक्षक आवश्यक असल्यास तालुका / जिल्हा / राज्य निवड व सनियंत्रण समिती आवश्यकतेनुसार या कामासाठी अतिरिक्त विषयनिहाय तज्ज्ञ परीक्षक नेमू शकते. सदर अतिरिक्त तज्ज्ञास याबाबतचे गौरवपत्र देण्यात येईल.

११) उपरोक्त मुदतवाढीमुळे स्पर्धेच्या विविध स्तरावरील कालमर्यादेत खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.



शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ करिता नावनोंदणी व व्हिडीओ अपलोड करणेबाबत scert चे संचालक श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी परिपत्रक दि २० जुलै 2023 रोजी निर्गमित केले आहे. या परिपत्रकानुसार........

राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ बाबत आयोजन, सविस्तर सूचना वितरण व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना सोपविण्यात आलेले आहेत. यानुसार २०२३ - २४ दरम्यान शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ साठी नियोजन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीमध्ये प्रस्तुत स्पर्धेसाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक-प्रशिक्षक यांचे कडून आवेदन स्वीकारण्याचे प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार स्पर्धेसाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत https://scertmaha.ac.in/vcomp2023/ (LINK)

ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदरील लिंकवर स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक-प्रशिक्षक यांनी नोंदणी करावयाची आहे.

सदर स्पर्धेसाठी आवश्यक अटी :-

(कृपया अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा)

१. स्पर्धेकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या ऑनलाईन https://scertmaha.ac.in/vcomp2023/ या संकेतस्थळास भेट देवून आपली सर्व माहिती अचूक भरावी.

२. उमेदवारांना कोणत्याही एका गटासाठीच अर्ज सादर करावा. एका उमेदवारास एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत.

३. ज्या शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्यांना तालुका/जिल्हा/राज्य पातळीवरील निवड समितीत सदस्य म्हणून घेवू नये. यावावतची खात्री संबंधित तालुका/जिल्हा/राज्य पातळीवरील निवड समितीने करावी.

४. स्पर्धेची नोंदणी व व्हिडीओ अपलोड प्रक्रिया दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. स्पर्धेची नोंदणी दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी रात्री १२.०० वाजता वंद होईल.

५. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर व व्हिडीओ अपलोड संदर्भ क्र. १ चे निकषानुसार त्यांचे प्रथम तालुका स्तरावर मूल्यमापन होईल. तालुका स्तरावरील यशस्वी उमेदवार जिल्हा स्तरावरील मूल्यमापनासाठी पाठविण्यात येतील. त्यानंतर जिल्यातील यशस्वी उमेदवार राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी पाठविण्यात येतील. असे सर्व ३६ जिल्यातील उमेदवारांमधून योग्य उमेदवार राज्यस्तरावर राज्य स्तरीय निवड समिती मार्फत निवडून त्यांना पारितोषिके देण्यात येतील.

६. यासाठी उमेदवारांना संबधित जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतून पुढील सूचना देण्यात येतील.

७. प्रस्तुत स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे ०६ गट करण्यात आलेले आहेत.


गट क्र. १-१ ली व २ री

गट क्र. २-३ री व ५ वी

गट क्र. ३-६ वी ते ८ वी

गट क्र. ४-९ वी ते १० वी

गट क्र. ५- ११वी व १२ वी

गट क्र. ६- अध्यापक विद्यालय


८. स्पर्धेसाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने पोर्टलवर शाळेची माहिती, शाळेचा UDISE क्रमांक,

ई-मेल आय.डी, बँक खाते तपशील, व्हिडीओ लिंक इत्यादी माहिती सोवत ठेवावी.

९. स्पर्धेसाठी संबंधितांनी गटनिहाय भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह या विषयांपैकी आपला योग्य तो विषय निवडावा.

१०. नावनोंदणी करत असताना खालीलपैकी एका प्रकारावरील व्हिडीओ तयार करावा.


  • कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडीओ तयार करणे.
  • स्वतः स्क्रीन रेकोर्ड करून तयार केलेला व्हिडीओ
  • स्वतः केलेला Animated व्हिडिओ
  • स्वतः पेन टॅबलेटचा वापर करून वनवलेला व्हिडीओ.
  • Immersive_eContent (Augmented Reality / Virtual Reality / Virtual Lab / ३६० Degree/Simulations) वर आधारित व्हिडीओ
  • खेळावर आधारित व्हिडीओ (Gamification)
  • ई-चाचणीवर आधारित व्हिडीओ (E-assessments)
  • शासन प्रणालीवर आधारित वोलीभाषेतून केलेला व्हिडीओ
  • दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्ययनासाठी व्हिडीओ
  • राज्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती वर आधारित व्हिडिओ



११.तालुका/जिल्हा/राज्य स्तरावरील सहभागी तसेच विजयी उमेदवारांना बक्षिसे, रोख रक्कम व प्रमाणपत्र वितरीत करणेत येईल.

१२. स्पर्धेचे आयोजन, पारितोषिक स्वरूप, मूल्यमापन / गुणदानाचे निकष, उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष, व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी, व्हिडिओ निर्मितीसाठी घ्यावयाची दक्षता, विविध स्तरावरील निवड समिती गठन करणे इ इतर महत्वाच्या बाबींसाठी संदर्भ क्र. १ चे शासन निर्णयाचे अवलोकन करणेत यावे.

व्हिडीओ उमेदवारांचे मूल्यमापन / गुणदान करण्यासाठी खालील निकषांचा वापर करावा,



उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष-

व्हिडीओ निर्मिती साठी आवश्यक आशय मजकूर आदर्श असावा. व्हिडीओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा. व्हिडीओ ची साईज हि विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी.

निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम.

व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत

शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी वावींना महत्व असेल. आवाजात सुस्पष्टता असावी. आवाजाची / वोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोह- अवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा. जर वॅकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. वॅकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशयाशी संबंधित असावे.


व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी-

शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ वनविणे आवश्यक आहे. वरील व्हिडीओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक व्हिडिओ वनविणार्याने स्वतः चा थोडक्यात परिचय समावेश करावा.

व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा, पत्ता या वावी व्हिडिओमध्ये समाविष्ठ करू नयेत. व्हिडिओच्या शेवटी या वावी फक्त स्क्रिनवर दिसाव्यात.

घटक, व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे, हे सुरुवातीला स्क्रिनवर दाखवावे. व्हिडीओ ची लांबी कमीत कमी ५ मि. व जास्तीत जास्त ९ मिनिटांची असावी.

व्हिडीओ फॉरमॅट MP4 असावा.

व्हिडीओ मध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यमांची, व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी.

व्हिडीओ मधील मजकूर व आशयावावत पूर्णतः संवंधित शिक्षक जवावदार असणार आहे, याची नोंद घ्यावी.

व्हिडीओ मध्ये वापर करण्यात येणारी इमेज अथवा मजकूर हा कॉपीराईट मुक्त (Creative Commons) असण्यावावत दक्षता घेण्यात यावी. कॉपीराईटची लायसन्सच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काळजी घ्यावी. यावावत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्धक जवावदार असतील.

राज्यस्तरावरून निवड करण्यात आलेल्या व्हिडीओजच्या creator ला तो व्हिडीओ त्यांनीच तयार केला आहे. हे सिद्ध करावे लागेल. अन्यथा तो व्हिडीओ स्पर्धेतून वाद करण्यात येईल.

शैक्षणिक व्हिडिओच्या दर्जानुसार शिक्षकांना प्रोत्साहनपर वक्षीस दिले जाईल व सदरच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओज हे त्याच्या creator च्या नावासह शिक्षण विभागाच्या वेवसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

स्टॉक शॉट्स किंवा कोणतेही कॉपीराइट केलेले ग्राफिक्स / इमेज संकलित करून तयार केलेले व्हिडिओ स्पर्धेसाठी पात्र नसतील.

एका स्पर्धकाने एका गटासाठी फक्त एकच व्हिडिओ पाठवावा.

सर्व नोंदींची एक प्रत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राखून ठेवली जाईल.

पुरस्कार विजेत्या व्हिडिओचे प्रसारण DIKSHA/OER आणि शासनाद्वारे व्यवस्थापित इतर वेवसाइट्स/पोर्टलवर अपलोड करण्यात येतील.

तालुका/ जिल्हा/ राज्य स्तरावरील स्पर्धांचे निकाल तालुका/ जिल्हा/ राज्य निवड समिती मार्फत अंतिम केला जाईल (स्वतंत्रपणे ऑडिओ आणि अॅनिमेशन / इमर्सिव्ह ई-कॉन्टेंट/डिजिटल गेम्स आणि अॅप्लिकेशन श्रेणीसाठी) ज्युरीने घोषित केलेले निकाल वंधनकारक असतील.

व्हिडिओ निर्मितीसाठी पुढील दक्षता पाळण्यात यावी-

कोणत्याही प्रकारची हिंसा, लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अमली पदार्थांचा वापर यांचा व्हिडीओ निर्मितीत समावेश असल्यास,

वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक, स्त्रिया किंवा लिंग पूर्वाग्रहाचे समर्थन करणारी सामग्री व्हिडीओ निर्मितीत समावेश असल्यास,

तांत्रिक त्रुटी असल्यास ( उदा. सुरु न होणे, मध्येच बंद होणे)

कोणत्याही कॉपीराइट ©, वैयक्तिक वौद्धिक संपदा (IPR), Creative Commons कायद्याचे उल्लंघन असल्यास,

साहित्यिक चोरीचा (plagiarism) समावेश असल्यास,

असे व्हिडीओ पडताळणी अंती कोणत्याची स्तरावर वाद करण्यात येतील. यावर स्पर्धकाचा कोणताही आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही.

१३.शिक्षकांनी आपले तयार केलेले व्हिडीओ आपल्या गुगल ड्राईव्ह (Google Drive) ला अपलोड करून Anyone with link करून Editor त्याचा Access हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील इच्छुकांना आपल्या स्तरावरून निदर्शानास आणून द्याव्यात व सदर स्पर्धेसाठी जास्तीत जास्त उमेदवारांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे. स्पर्धेच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

१. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४

२. डॉ. संदीप मुळे, अधिव्याख्याता, मो. क्र. ८६९२८५७२२२

3. श्री. अभिनव भोसले. विषय सहाय्यक. मो. क्र. ७७२२०७४२९४

अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक व GR वाचा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .