शाळा स्तरावर PFMS प्रणालीकरिता समग्र शिक्षा चे HDFC बँकेचे खाते कार्यान्वित करणेबाबत.

शाळा स्तरावर PFMS प्रणालीकरिता समग्र शिक्षा चे HDFC बँकेचे खाते कार्यान्वित करणेबाबत.


राज्य प्रकल्प संचालक श्री कैलास पगारे यांनी दि २7 जुलै २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून असे सूचित केले आहे कि.....

सद्यस्थितीत राज्यस्तरावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाचे समग्र शिक्षा करिता HDFC बँकेचे SNA खाते कार्यान्वित आहे व त्या अनुषंगाने इम्प्लिमेंटिंग एजन्सी (IAS) जिल्हा परिषद मनपा, SCERT, पुणे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, DIET व तालुकास्तरा पर्यंत HDFC बँकेचे Zero Balance Account ( ZBA) खाते कार्यान्वित आहे. संपूर्ण शाळा स्तरापर्यंत PFMS प्रणालीद्वारे निधीचे वितरण करणे विचाराधीन असल्याने शाळा स्तरापर्यंत खाते उघडण्याची कार्यवाही संबंधित जि.प./मनपा/तालुका येथील शिक्षणाधिकारी/गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

आपणाकडून शाळानिहाय प्राप्त झालेल्या ( MAKER / CHECKER ) तपशिलानुसार प्राधिकृत वापरकर्ता यांची शिक्षणाधिकारी / गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांनी खातरजमा करून KYC आधारे उपरोक्त खाते कार्यान्वित करणे आवश्यक आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबधित शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांची व्यक्तीशः राहील तसेच केलेली KYC हि जि.प./मनपा/शिक्षणाधिकारी / प्रशाशन अधिकारी / गटशिक्षण अधिकारी यांनी शाळा निहाय दिलेली यादी योग्य असल्याची खातरजमा HDFC बँक यांचे संबंधित प्रतिनिधी यांनी देखील खातरजमा करणे आवश्यक आहे, तदनंतर सदर KYC केल्यानंतर सदरचे खाते PFMS प्रणालीशी कार्यान्वित करून निधी वितरणाची कार्यवाही जिल्हास्तरावरून तालुकास्तर, तालुकास्तरावरून शाळा स्तरावर करणे आवश्यक राहील.

उपरोक्त नुसार शाळास्तरापर्यंत खाते उघडण्याची कार्यवाही करण्याकरिता HDFC Bank यांनी आपल्या स्तरावर आपल्या संबधित अधिकारी / कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. शाळास्तरापर्यंत खाते उघडण्याची व कार्यान्वित करण्याची कार्यवाही करण्याकरिता शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी/गटशिक्षण अधिकारी यांनी HDFC बँक यांचे प्रतिनिधी यांचेशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .