पहिले पाऊल" (स्टार्स प्रकल्प अंतर्गत ) शाळापूर्व तयारी अभियानात कार्यरत माता गटांचे कौतुक व या वर्षाची निपुण लक्ष गाठण्यासाठीची सुरुवात दि.१५/०८/२०२३ रोजी निपुण शपथ घेऊन करणे बाबत
राज्य प्रकल्प संचालक श्री कैलास पगारे यांनी दि २५ जुलै २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून असे सूचित केले आहे कि.....
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये “स्टार्स प्रकल्प" अंतर्गत इयत्ता पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी “पहिले पाऊल” शाळापूर्व तयारी अभियान हे आपणा सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या राबविला गेला. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे दिनांक २४ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत शाळास्तरावर इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांकरीता पहिला मेळावा व २० जून, २०२३ ते ५ जुलै, २०२३ या कालावधीत दुसरा मेळावा घेण्यात आले.
या मेळाव्याचे खूप जल्लोषात आयोजन महाराष्ट्रात करण्यात आले. सदर कार्यक्रमामुळे शासन, शाळा, ग्रामपंचायत, माता गट, लीडर माता, स्वयंसेवक व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या समन्वयाने व पुढाकाराने गावात लक्षणीय शैक्षणिक वातावरण तयार झाल्याचेही दिसून आले.
आपल्या सर्वांच्या सहभागाने व उत्तम प्रतिसादाने आपण “पहिले पाऊल” शाळापूर्व तयारी अभियान मेळावा यशस्वीरित्या पार पाडू शकलो यासाठी सर्वांचे खूप खूप अभिनंदन व आभार. सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि जनभागीदारी अंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळेअंतर्गत असलेल्या निपुण माता गटांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून आपल्याला राज्यभरात “१५ ऑगस्ट, २०२३ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा स्तरावर माता गटांना एकत्र करून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करायचे आहे. त्यांच्या गटांना सन्मानित करून त्यांच्याकडे असलेल्या “पहिले पाऊल" पुस्तिका व माता गटांना जात असलेल्या आयडिया व्हिडीयो विषयी व त्यांनी मुलांच्या शिक्षणात वाढविलेला सक्रीय सहभागाबद्दल गावातील नागरिकांना माहिती देणे, जेणेकरुन प्रत्येक नागरीक आपलं प्रत्येक मूल निपूण होण्यासाठी आपला सक्रीय सहभाग देवू शकेल.
आपल्याला माहिती आहेच की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाला अनन्य साधारण महत्त्व दिले असून त्याकरीता “निपूण भारत मिशन” कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक मूल निपूण व्हावे, अशी आपणा सर्वांची इच्छा व महत्त्वाकांक्षा आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक मूल निपूण व्हायचे असेल तर यामध्ये शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत सर्व माता पालक खूप चांगले काम करीत आहात. परंतु, आणखी ही खूप जास्त काम करण्याची गरज आहे. जेणेकरुन, शासनाने निश्चित केल्याप्रमाणे सन २०२६-२७ पूर्वी आपण निपूण भारत अभियानाने अपेक्षतली सर्व उद्दिष्टे पूर्ण करुन घेऊ व महाराष्ट्रातील प्रत्येक मूल निपूण करण्यास हातभार लावू शकू, यामध्ये आपणा सर्वांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे.
याकरीता माता पालक गटाच्या कौतुक सोहळयाचे स्वरुप सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे आहे.
१) गावातील सर्व निपुण माता- गटांना ( इयत्ता १ ली ते ३ री च्या मुलांच्या मातांचे गट) सदर कार्यक्रमासाठी निमंत्रित करणे.
२) सर्व मातांना यावर्षीची वर्गनिहाय निपूण लक्ष काय आहेत याची माहिती देणे व ती प्राप्त करण्यासाठीचा कार्यक्रम आखणी करणे.
३) सदर कार्यक्रमात प्रत्येक गटाच्या वतीने लीडर मातांना आपले मनोगत व्यक्त करण्याची
संधी देणे.
४) यापुढे देखील माता- गट सक्रीय राहण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे, ज्यामध्ये आपण दिलेल्या शाळेतील "पहिले पाऊल" पुस्तिकेचा वापर
करणे. आयडिया व्हिडीओच्या मदतीने गटातील कार्य सुरु ठेवणे.
५) सर्वांनी मिळून निपूण शपथ घेणे.
तरी सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजनपर आपल्या स्तरावर जिल्हा स्तरीय, तालुका स्तरीय व केंद्र स्तरीय बैठका आयोजित करून “१५ ऑगस्ट, २०२३ रोजी कार्यक्रमात माता-गट कौतुक करण्याचे नियोजन करावे व या वर्षीची वर्गनिहाय निपूण लक्ष प्राप्तीसाठी नियोजन करावे. तरी सदर कार्यक्रमास विभागस्तर, जिल्हास्तर व सबंधित अधिकारी यांनी उपस्थित राहावे.
चला तर मग महाराष्ट्रातील प्रत्येक मूल प्रत्येक वर्षी इयत्तानिहाय “निपूण लक्ष" प्राप्त करतील, अशी शपथ घेवू या!
शुभेच्छासह !
धन्यवाद !
अधिक व सविस्तर माहिती साठी परिपत्रक पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .