UDise 2022-2023 अंतिम मुदत व इतर महत्वपूर्ण सूचना बाबत
MPSP च्या सह संचालक (कार्यक्रम) मा. सरोज जगताप यांनी दि २८ जून २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार......
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक माहिती भरण्याकरिता भारत सरकारकडून माहे जानेवारी, २०२३ पासून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या प्रणालीमध्ये उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना व निर्देशांक (Samagra Shiksha, STARS, Mid Day Meal, PMShri, PGI, SEQI, Prabhandh) काढण्यासाठी माहितीचा उपयोग होतो. यु-डायस प्रणालीमध्ये शाळांची माहिती भरून पूर्ण न झाल्याने माहे मे, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु राज्याची अद्यापपर्यंत माहिती पूर्ण न झाल्याने भारत सरकारकडून नाराजी व्यक्त केलेली आहे.
सन २०२२-२३ यु-डायस प्लसमध्ये आधार सीडिंग डेटा विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती घेण्यासाठी प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आधार सीडिंग डेटानुसार पुढील वर्षामध्ये केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना निधी मंजूर करणार असल्याबाबत कळविले आहे.
केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार आपणास कळविण्यात येते की, दि. ३० जून, २०२३ पर्यंत राज्यातील शाळा, विद्यार्थी व शिक्षक माहिती यु-डायस प्रणालीमध्ये आधार सीडिंगकरून पूर्ण करण्यात यावी, अन्यथा यु-डायस प्रणालीमध्ये उपलब्ध करून दिलेली माहिती प्रणालीद्वारे अंतिम करण्यांत येईल व त्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक सविस्तर वाचा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी व शिक्षक करितांची महत्वपूर्ण माहिती पाठवा.
उत्तर द्याहटवाAditi kundali veer
उत्तर द्याहटवाAlisha Amjad shikh
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .