समग्र शिक्षा अंतर्गत शालेय गणवेश योजना मार्गदर्शक सूचना बाबत परिपत्रक २०२३ -२०२४ I Circular Regarding School Uniform Scheme Guidelines 2023-2024 Under Samagra Shiksha

समग्र शिक्षा अंतर्गत शालेय गणवेश योजना मार्गदर्शक सूचनाबाबत परिपत्रक २०२३ -२०२४

Circular Regarding School Uniform Scheme Guidelines 2023-2024 Under Samagra Shiksha



         मार्गदर्शक सूचनाबाबत

       महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिनांक 29 मे 2023 रोजी परिपत्रक काढून २०२३-२०२४ च्या गणवेशा संदर्भात अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत की......

 1. समग्र शिक्षा अंतर्गत प्रति लाभार्थी रक्कम 300 याप्रमाणे निधी उपलब्ध झाल्यानंतर 300 या दराने एक गणवेश संचाचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांकडे भौतिक लक्षाप्रमाणे तात्काळ वर्ग करण्यात यावा.

2. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या निकष पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एक गणवेश  शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत निर्धारित करण्यात आलेला गणवेश वितरित करण्यात यावा. सदर योजनेच्या लाभापासून गणवेश पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

 3.लाभार्थी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या दुसऱ्या गणवेशाबाबत शासन स्तरावर प्राप्त होणाऱ्या सूचनानुसार कार्यवाही करावी. दोन्ही गणवेश वापराबाबत शासनाच्या सूचनानुसार मुख्याध्यापक यांनी कामकाज करावे. 

4. शाळा व्यवस्थापन समिती यांना अनुदान वितरणास विलंब होऊ नये म्हणून सदरचे अनुदान जिल्हास्तरावरून थेट तालुकास्तरावर पीएफएमएस प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात यावे व शाळा व्यवस्थापन समिती यांनी गणवेश वितरणाची कार्यवाही विहित कार्यपद्धत तिचा अवलंब करून गणवेश खरेदी करावी व देयकांची अदायेगी करण्याकरता संबंधित प्रमाणके व उप प्रमाणके तालुकास्तरावर सादर करावे. 

5. राज्य शासनाचे सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विभागामार्फत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी गणवेश अथवा शासनमान्य वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जात असल्यास अशा लाभार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. एकाच विद्यार्थ्यास दुबार गणवेशाचा लाभ अनुदेय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. ज्या महानगरपालिकांकडून त्यांच्या स्वनिधीमधून महानगरपालिका अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येतो अशा लाभार्थी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेशाचा दुबार लाभ देण्यात येऊ नये.

 6. वरील नमूद प्रमाणे प्रस्तावित एक गणवेश वितरणाच्या अनुषंगाने शालेय गणवेशाचा रंग, प्रकार, स्पेसिफिकेशन इत्यादी बाबी संदर्भात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा. 

7. प्रस्तावित प्रमाणे एक गणवेश वितरणाबाबत संपूर्ण अधिकार संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचा असल्याने शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर निर्णय घेण्यात यावा. 

8. प्रत्येक शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून त्यांच्या शाळेतील गणवेश पात्र विद्यार्थ्यांच्या वयोगटा नुसार व विद्यार्थ्यांच्या मापानुसार साईज प्रमाणे मुलांसाठी आणि मुलींसाठी गणवेश खरेदी करून वितरित करावे. 

9. गणवेश शिलाई पक्क्या धाग्याची असावी. गणवेश शिलाई निघाल्यास, गणवेशाचे कापड फाटल्यास अथवा गणवेशाबाबत कोणतीही तक्रार उपस्थित झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहील. 

10. प्रस्तावित प्रमाणे सध्या प्रती लाभार्थी एक गणवेश संचाकरता रुपये 300 तरतुदी पेक्षा अधिकसा खर्च होणार नाही याची दक्षता देखील संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने घेणे आवश्यक्य आहे. रुपये 300 तरतुदी पेक्षा जादा खर्च झाल्यास जादा झालेल्या खर्च मान्य केला जाणार नाही.

 

11. प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात व गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या गटातील संबंधित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश वितरणाबाबत योग्य मार्गदर्शन करावे. 

12. गणवेश खरेदी देवकांची अदाएगी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने पी एफ एम एस प्रणालीच्या माध्यमातून करावी. गणवेश पुरवठा रोखीने अदायगी करू नये. अदायिक केल्याबाबतचे अभिलेखी संपूर्ण हिशोबाच्या अचूक नोंदी तसेच दस्तऐवज जतन करून ठेवावेत. लेखापरीक्षणा वेळेस लेखापरीक्षाकास संपूर्ण दिनांकासह हिशोबाची माहिती व अभिलेखी उपलब्ध करून देता येतील याप्रमाणे लेखा विषयक बाबींच्या नोंदी ठेवण्यात याव्यात. 

13. शाळा स्तरावर स्टॉक रजिस्टर ठेवण्यात यावे. सदर रजिस्टर मध्ये गणवेश वितरणाचा दिनांक व गणवेश मिळाल्याबाबत संबंधित लाभा विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची स्वाक्षरी अंगठ्याचा ठसा घेणे आवश्यक आहे. 

14. गणवेश वितरणाबाबतची कार्यवाही झाल्यानंतर भारत सरकार यांची प्रबंध पोर्टलवर झालेल्या खर्चाची नोंद तात्काळ करण्यात यावी. मंजूर तरतुदी मधील रक्कम शिल्लक असल्यास सदरची तरतूद याच वित्तीय वर्षात राज्यस्तरावर जमा करावी व त्याबाबतची नोंद ठेवण्यात यावी.

 15. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्ह्यातील गणवेश वितरणाची सर्व गटांची अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार त्यांच्या जिल्ह्याचा संकलीत अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयास व शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे या कार्यालयास ऑगस्ट 2023 अखेर सादर करावे. 

16. गणवेश वितरणामध्ये विलंब होणार नाही तसेच गणवेश पात्र लाभार्थी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी ,गटशिक्षणाधिकारी, महानगरपालिका प्रशासन अधिकारी व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी घेणे आवश्यक्य आहे. 

17. प्रस्तावित प्रमाणे गणवेश पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी सध्या एक गणवेश यांची वितरीत होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने योग्य नियोजन करून उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या तरतुदीचा व्हिडिओ करण्यात यावा.

अधिक माहितीसाठी सन २०२३-२०२४ चे परिपत्रका पहा.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.