शाळा प्रवेशोत्सव School Entrance Festival
शाळा प्रवेशोत्सव बाबत शासनाने खालील दोन शासन निर्णय GR काढून सूचना दिल्या आहेत. आपण दोन्ही GR च्या मार्गदर्शक सूचना पाहूयात.
शासन निर्णय दि. 9 जून २०१5 नुसार शाळा प्रवेशोत्सव बाबत खालील सूचना दिल्या आहेत. ( अधिक माहिती साठी व GR download साठी येथे click करा.)
१. शाळा सुरू होण्याच्या पुर्वदिवशी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, बचत गट, महिला मंडळे, जेष्ठ नागरिक संघ ) यांच्या सहकार्याने शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या घरी भेट देणे, पदयात्रा व शाळा परिसर स्वच्छता / सुशोभीकरण करावे याबाबत सविस्तर तपशील परिशिष्ट - अ प्रमाणे राहिल.
२.शाळा सुरू होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहुन प्रभातफेरी आयोजन, विद्यार्थ्यांचे फूले देवून स्वागत, मोफत पुस्तक वितरण इ. कार्यक्रम आयोजित करावेत. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, बचत गट, महिला मंडळे, जेष्ठ नागरिक संघ) यांचे सहकार्य घ्यावे. सविस्तर तपशील परिशिष्ट- ब प्रमाणे राहिल.
३.शाळा सुरू होण्याच्या दिवशी शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची विनंती शाळा असणाऱ्या गाव / प्रभागात निवास असणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या सदस्य / पदाधिकाऱ्यांना करण्यात यावी. या प्रमाणे सदस्यांचे निवासस्थान परिसरात शाळा असणाऱ्या गाव/ प्रभागात नसल्यास स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच / उपसरपंच तसेच जेष्ठ सदस्य यांचेव्दारा स्वागत करावे.
४.जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्हयाचे संसद सदस्य, पालकमंत्री महोदय व स्थानिक मंत्री महोदय यांना जिल्हयातील एका शाळेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती करावी.
५.गट शिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी म.न.पा. यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संसद सदस्य व विधीमंडळ सदस्य यांना जिल्हयातील एका शाळेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती करावी.
६.या कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी.
७.सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी, उपसंचालक, सहसंचालक, संचालक, डायट प्राचार्य यांनी किमान एका शाळेवर उपस्थित राहावे.
८.शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या इतर विभागातील वर्ग २ व त्यावरील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी शाळा निहाय निमंत्रित करावे.
९.शाळेच्या प्रथम दिवशी मध्यान्ह भोजन योजनेतील जेवणात गोड पदार्थाचा समावेश करावा.
१० शाळेच्या प्रथम दिवशी स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी यांनी शिक्षणाबाबत सांस्कृतिक कार्यक्रम करणार असतील तर त्यास प्रोत्साहन दयावे.
११.या कार्यक्रमासाठी येणारा खर्च सादिलनिधी तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या निधीतून भागविण्यात यावा.
१२.शाळा प्रवेशोत्सवामध्ये विद्यार्थीकेंद्रीत कार्यक्रम घेण्यात यावेत व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचा कालावधी जास्तीत जास्त एक तास असावा, नंतर दैनंदिन कामकाजास सुरुवात करावी.
1. शाळा सुरू होण्याच्या पुर्व दिवशी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, बचत गट, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ) यांच्या सहकार्याने शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या घरी भेट देणे, पदयात्रा व शाळा परिसर स्वच्छता / सुशोभीकरण करावे. याबाबत सविस्तर तपशील परिशिष्ट-अ प्रमाणे राहील.
2. शाळा सुरू होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभातफेरी आयोजन,
विद्यार्थ्यांचे फुले देवून स्वागत, मोफत पुस्तक वितरण इ. कार्यक्रम आयोजित करावेत. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, बचत गट, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ) यांचे सहकार्य घ्यावे. सविस्तर तपशील परिशिष्ट- ब प्रमाणे राहिल.
3.शाळा सुरू होण्याच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची विनंती शाळा असणाऱ्या गाव / प्रभागात निवास असणाऱ्या स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या सदस्य / पदधिकाऱ्यांना करण्यात यावी. या प्रमाणे सदस्यांचे निवासस्थान शाळा असणाऱ्या गाव / प्रभागात नसल्यास स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच/उपसरपंच तसेच ज्येष्ठ सदस्य यांचेव्दारा स्वागत करावे.
4.जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्हयाचे पालकमंत्री व स्थानिक मंत्री महोदय यांना जिल्हयातील एका शाळेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती करावी.
5.गट शिक्षणाधिकारी/ शिक्षणाधिकारी म.न.पा. यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संसद सदस्य व विधीमंडळ सदस्य यांना जिल्हयातील एका शाळेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती करावी.
6.या कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी.
7.सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी, उपसंचालक, सहसंचालक, संचालक, डायट प्राचार्य यांनी किमान एका शाळेवर उपस्थित राहावे.
8.शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या इतर विभागातील वर्ग-२ व त्यावरील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी शाळा निहाय निमंत्रित करावे.
9. शाळेच्या प्रथम दिवशी मध्यान्ह भोजन योजनेतील जेवणात गोड पदार्थाचा समावेश करावा.
10.शाळेच्या प्रथम दिवशी स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी शाळेबाबत अथवा शिक्षणाबाबत सांस्कृतिक कार्यक्रम करणार असतील तर त्यास प्रोत्साहन दयावे.
या कार्यक्रमासाठी येणारा खर्च सादिल निधी तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या निधीतून भागविण्यात यावा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .