केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा पदभरती २०२३
(नोंदणी लिंक,जाहिरात, पात्रता, तपशील, आरक्षण, परीक्षा स्वरूप,घटक, उपघटक, अभ्यासक्रम ,निवड प्रकिया, अर्ज पद्धत ,प्रतिज्ञा पत्र, परीक्षा शुल्क, केंद्र निवड, अर्ज प्रक्रिया ,प्रवेशपत्र ,प्रवेश,सर्वसाधारण सूचना)
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - 2023 या परीक्षेच्या आयोजनाबाबत.
या कार्यालयाची अधिसूचना जा.क्र.मरापप/बापवि/2023/3504, दिनांक 05/06/2023 अन्वये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 या परीक्षेचे आयोजन माहे जून 2023 च्या शेवटच्या आठवडयामध्ये करण्यात आले होते. परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण 2022/प्र.क्र.81 / टीएनटी-01, दि. 20 जून 2023 अन्वये मान्यता मिळाल्यानुसार प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येते आहे. परीक्षेचा पुढील कालावधी यथावकाश परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
नोंदणी करण्यासाठी येथे click करा.
- :: How to Apply
- :: Frequently Asked Questions: For On-Line Registration Process.
- :: Important Points
- :: Guidelines for scanning the Photograph & Signature
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.
पात्रता
३.१ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. मनपा, खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
३.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
३.३ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष
३.४ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी पात्र राहतील.
४. आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतूदी
४.१ दिव्यांग आरक्षण
४.१.१ दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. दिव्यांग २०१८/प्र.क्र. १९४/१६ अ, दिनांक २९/०५/२०१९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल,
४.१.२ दिव्यांग व्यक्तीची संबंधित संवर्ग पदांकरीता पात्रता शासनाकडून वेळो वेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
४.१.३. संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे किमान ४० टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलतीसाठी पात्र असतील.
४.१.४ दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अग्रक्रि- २०१८/प्र.क्र. ४६ / आरोग्य ६. दि. १४/०९/२०१८ मधील आदेशानुसार केंद्रशासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीव्दारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
५. परीक्षा योजना:-
५.१ परीक्षेचे टप्पे एक लेखी परीक्षा
५२ परीक्षेचे स्वरूप- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
१५.३ प्रश्नपत्रिका एक
४. एकूण गुण २००.
५.५ लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रमः
परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील.
अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे स्वरुप
उपघटक 1
भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय.
(अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची माहिती अद्ययावत दुरुस्त्यांसह)
ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी
क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिता.
ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन व शिष्यवृत्ती
(इ) विशेष गरजा असणान्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना
उपपटक 2
शिक्षण क्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य
UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT. TISS, TIFR, Homi Bhabibia Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.
उपघटक 3
माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)
अ) इंटरनेटचा प्रभावी वापर
ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे
क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL U-DISE +)
ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान
3) माहितीचे विश्लेषण
फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब
उपघटक 4
अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती
अ) पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम
ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा
क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
ड) प्रश्न निमिती ( स्वाध्याय) कौशल्य:ASER, NAS, PISA
इ) प्रगत अध्ययन-अध्यापनशास्त्र
(फ) निकालासंबंधीची कामे
उपपटक 5
माहितीचे विश्लेषण मूल्यमापन
(अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण
ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे
क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे..
ड) संप्रेषण कौशल्य समाज संपकांची विविध साधने
उपघटक 6
विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान
अमराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान
(a) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी
(क) क्रीडा विषयक घडामोडी
६. निवड प्रक्रिया :-
६.१ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
६.२ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून कमाल अर्हता धारण केली म्हणून / उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
६.३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणान्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल,
परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दत:-
७.1 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepapr23 या लिंकदारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
७.२ परीक्षा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
७.३ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
(अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी x ३५सेमी फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.आकारमान 200 X 300 pixelsफाईल साईज 20kb 50kb
(ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.आकारमान 140 X 60 pixels फाईल साईज 10kb 20 kb
क)डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ x ३. सेमी पांढन्या कागदावर काळया / निळया शाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची आकारमान 240 X 240 pixels in 200 DPIनिशाणी वापरावी.फाईल साईज 20kb 50kb
(ड) स्व. हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्वहस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र
(१० सेमी x ५ मी पाहल्या कागदावर काळ्या निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 800 X 400 pixels in 200 DPIफाईल साईज 50kb 100 kb
स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना
(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
“मी…............... उमेदवाराचे नाव).–
याव्दारे घोषित करतो की, मी अर्जामध्ये सादर केलेली सर्व माहिती योग्य सत्य आणि बंध आहे. मी सदरची कागदपत्रे आवश्यक असेल तेव्हा सादर करीन.”
अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी
सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कैन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. ( लिहू न शकणान्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतः च्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)
७.४ परीक्षेचे शुल्क :
१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. 9५०/- २. दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचारकेला जाणार नाही.
७.५ परीक्षा केंद्र निवड:
जिल्हा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसन्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.
८. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी
९. सर्वसाधारण
माहे जून २०२३ शेवटचा आठवडा (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार ग्रामध्ये बदल होऊ शकतो.)
९.१ अर्ज सादर उमेदवाराने स्वतःचा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे. ९.२ ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
9.३ “प्रस्तुत परीक्षे करीता अर्ज विचारत घेण्यास शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गटशिक्षणाधिकारी यांनी अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर ५ दिवसाचे आत परीक्षा परिषदेस कळविणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता अर्ज विचारत घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषदेस तसे कळविण्याची आवश्यकता नाही असेही उमेदवाराने संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे.
9.४ प्रस्तुत परीक्षा ही स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा (Qualifying Examination) नाही. स्वतः आपल्या गटाशक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
९.५ परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकान्यांकडून तपासली जाईल. सदर परीक्षेमधील उमेदवाराच्या कामगिरीच्या (Performance) आधारे नियुक्ती मागण्याचा उमेदवारास कोणताही हक्क असणार नाही.
९.६ परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा सक्षम प्राधिकारी यांनी सेवा समाप्त केल्यास अथवा धारणाधिकार न ठेवता संववाहय पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाही.
९.७ अर्जामधील नमूद माहितीच्या आधारे जाहीरातीमधील विहित अर्हतेबाबतच्या अटींची पूर्तता करतात असे समजून पात्रता न तपासता उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनंतर कोणत्याही टप्यावर उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची वा खोटी असल्याचे अथवा उमेदवार विहित अहंतेची पूर्तता करीत नसल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रह करण्यात येईल आणि त्याबाबतचा परीक्षा परिषदेचा निर्णय अंतिम राहील.
१ ०. प्रवेशपत्र
1०.१ परीक्षेसाठी प्रविष्ट होणान्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील, त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
१०.२ परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पैनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स या पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही नावामध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. उमेदवारांच्या नावात बदल गलेला असल्यास त्यासंबंधित विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्राची प्रत अथवा प्रतिज्ञापत्र याची मूळ तसेच छायांकित प्रत सोबत आणणे आहे.
११. परीक्षेस प्रवेश
१1.१ फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सुचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.
१1.२ स्मार्ट यच डिजिटल बॉच, मायक्रोफोन, मोबाईल, कैमरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लूटूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणत्याही वस्तू कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वहया नोट्स, पुस्तके, बॅग्ज, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास स्वतःजवळ बाळगण्यास त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य उमेदवारांनी आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अथवा परीक्षा केंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
१२. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती जाहिरात अधिकृत समजण्यात येईल. सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
१३. १४. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msce.kpexam2023@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.
गुण
पदसंख्या
अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात वाचा.
छान माहिती
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .