आंतर जिल्हा बदली 2023 , संवर्ग व प्राधान्यक्रम
आंतरजिल्हा बदलीकरीता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील इच्छुक शिक्षकांची राज्यस्तरावर प्रवर्ग निहाय संगणकीय पद्धतीने खालील प्राधान्यक्रमाप्रमाणे एकत्रित ज्येष्ठतासुची तयार करण्यात येईल.
८.१ ज्या शिक्षकांना दोन्ही जिल्हा परिषदांकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक
(सदर तरतूद केवळ सन २०२३ च्या आंतरजिल्हा प्रक्रियेसाठी मर्यादित राहील. सन २०२४ पासून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त शिक्षक हा संवर्ग आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वगळण्यात येईल.)
टीप - १ : काही जिल्हा परिषदांनी भविष्यात संबंधित बिंदू नामावलीमधील संबंधित बिंदूवरील पद उपलब्ध होईल या अटीवर ना-हरकत दाखले निर्गमीत केलेले असून, सदरचा शासन निर्णय बिंदूनामावलीप्रमाणे आंतरजिल्हा बदली मान्य करीत असल्याने सदर ना-हरकत दाखले प्राप्त केलेले शिक्षक या प्राधान्यक्रमात बसतील.
८.२ : विशेष संवर्ग शिक्षक भाग १ :-
या संवर्गांतर्गत खालील शिक्षकांचा समावेश होईल. क. पक्षाघाताने आजारी कर्मचारी (Paralysis).
ख. दिव्यांग कर्मचारी (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक
१४.०१.२०११ मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग व दिव्यांग मुलांचे पालक. (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत, असे शिक्षक.. ग. ह्रदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी.
घ. एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले कर्मचारी.
च. यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
छ. कॅन्सरने (कर्करोग) आजारी कर्मचारी.
ज. मेंदूचा आजार झालेले कर्मचारी.
झ. थॅलेसेमिया/कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार {उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व इतर आजार)} (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ).
ट. माजी सैनिक तसेच आजी / माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा.
ठ. विधवा कर्मचारी.
ड. कुमारिका कर्मचारी.
ढ. परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला कर्मचारी.
प. वयाने त्रेपन्न वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी.
फ. स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)
वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करताना दोघांची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याचा प्राथम्याने विचार करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्मदिनांक देखील एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनाव प्रथम येईल, अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात यावी.
८. ३ : विशेष संवर्ग शिक्षक भाग २ :- पती-पत्नी एकत्रिकरण
जर सध्या पती व पत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल. पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत
दांपत्यापैकी एकाने त्याचा जोडीदार ज्या जिल्हयात कार्यरत असेल, त्या जिल्हयात बदली मिळण्यासाठी अर्ज करावयाचा आहे. जोडीदार कार्यरत असलेल्या जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील. दोघांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
या विशेष संवर्गांतर्गत अर्ज करतांना दोघांनाही ते कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यात वदली हवी असल्यास पती-पत्नीची जोडी एक युनिट म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्या दोघांपैकी सेवाज्येष्ठ असणाऱ्या जोडीदाराची सेवाजेष्ठता ग्राह्य न धरता सेवेने कनिष्ठ असलेल्या जोडीदाराची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात येईल व दोघे कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा एकत्रित मागणी केलेल्या अन्य जिल्ह्यात त्यांचे निवड प्रवर्गानुसार बिंदू रिक्त असल्यास प्राधान्य मिळेल.
पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत असणारी वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. तथापि, एखाद्या जिल्ह्यामध्ये पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत अर्ज सादर करणाऱ्या शिक्षकांचा जिल्ह्यातील प्राधान्यक्रम सेवाजेष्ठता विचारात घेऊन ठरविण्यात येईल.
क. पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर.
ख. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल
तर.
ग. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल
तर
घ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका / नगरपालिका.
च. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.
छ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा अनुदानित संस्थेतील कर्मचारी असेल तर.
वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास वदलीसाठी त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करतांना दोघांची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याचा प्राथम्याने विचार करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्मदिनांक ही एक असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनाव प्रथम येईल अशा शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.
८.४ : सर्वसाधारण संवर्ग :-
त्यानंतर सर्वसाधारण अर्जदारांची आंतरजिल्हा बदलीसाठी ज्येष्ठता त्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात येईल. वरीलप्रमाणे ज्येष्ठता दिल्यानंतर सर्वसाधारण संवर्गातील अर्जदारांची सेवाज्येष्ठता विचारात घेण्यात येईल.
सेवाज्येष्ठता दिनांक एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनाव विचारात घेऊन जे आद्याक्षर प्रथम येते त्याप्रमाणे प्राधान्यक्रम प्रदान करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी खालील gr सविस्तर वाचा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .