दि.30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत....
केंद्र शासनामध्ये सीमाशुल्क व उत्पादन शुल्क खात्यामध्ये (Customs & Excise Department) अतिरिक्त महासंचालक या पदावर कार्यरत असतांना दि.३०.०६.२०१३ रोजी शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेले श्री. पी. अय्यमपेरुमल या अधिकाऱ्यास दि.०१.०४.२०१३ रोजीची वार्षिक वेतनवाढ फक्त निवृत्तीवेतनविषयक लाभासाठी अनुज्ञेय करावी असे आदेश मा. उच्च न्यायालय, मद्रास यांनी याचिका क्रमांक १५७३२/२०१७ मध्ये दि. १५.०९.२०१७ रोजी पारित केले आहेत. मा. उच्च न्यायालयाचे उपरोक्त दि.१५.०९.२०१७ रोजीचे आदेश विशेष अनुमती याचिका (Civil) डायरी क्रमांक २२२८३ / २०१८ मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.२३.०७.२०१८ रोजीच्या आदेशाद्वारे कायम केले.
२. उपरोक्त नमूद 'आदेशाचा आधार घेऊन अनेक याचिकाकर्त्यांनी मा. उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल केल्या होत्या. त्याअनुषंगाने मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक १८८१/२०२३ व इतर याचिकांमध्ये दि.१६.०२.२०२३ रोजी खालीलप्रमाणे आदेश दिलेले आहेत-
"We, therefore, find it appropriate to order as under :-
[a] We direct the Chief Secretary of the State of Maharashtra and Principal Secretary (Finance Department), State of Maharashtra, to issue appropriate directions to all the concerned departments to appeal to such candidates, who fall in such category having retired on 30th June of the particular years and who have earned the annual increment on account of performing work for 12 months ending on 30th June, to tender their applications to the concerned Authorities.
[b] After such applications are received, the concerned authorities would grant the reliefs as are being granted by the various High Courts by restricting the arrears of payments to 3 years preceding the dates of the applications or preceding the date of actual retirement as per actuals, whichever is less. With these guidelines, the concerned authorities shall not reject a single
application if it fits into the parameters of the judgments delivered by this Court.
[c] In the alternative, let the concerned authorities suo-moto dig out such cases and after scrutinizing the same as regards their entitlment, proceed to grant the benefits as per the judgments of this court, within 120 days.
[d] While undertaking the above exercise, the gratuity/pay fixation/ pension will be re-calculated, so as to be paid to the candidates with arrears as directed above."
मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेले उपरोक्त आदेश विचारात घेऊन सर्व विभागांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे.
जे राज्य शासकीय कर्मचारी दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील १२ महिन्यांची अर्हताकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि. ०१ जुलै रोजीची काल्पनिक (Notional) वेतनावाढ विचारात घेऊन, त्यांचे सेवानिवृत्तीवेतन सुधारीत करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील विभागप्रमुखांना कळवावे.
त्यानंतर याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर, संबंधित कार्यालयांनी वर नमूद केलेल्या मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त आदेशात नमूद केल्यानुसार संबंधितांना सुधारीत सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुज्ञेय करावेत. तसेच सदर लाभ सुधारीत करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील ३ वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक या पैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्ताचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये.
तसेच संबंधित कार्यालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अशा प्रकरणांचा त्यांच्या स्तरावरच तपासणी करुन निपटारा करावा.
उपरोक्त प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्या दिनांक १६.०२.२०२३ रोजी च्या आदेशातील परिच्छेद क्रमांक ९ मध्ये नमूद केले आहे की, This notional inclusion of the annual increment would be considered for re-calculating their pension, gratuity, earned leave, commutation of pension benefits etc. तरी त्याप्रमाणे अर्जदारास लाभ अनुज्ञेय करण्यात यावे.
मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त निर्णयाचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
अधिक माहितीसाठी GR download साठी येथे click करा.
फक्त राज्य शासकीय कर्मचारी जे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनाच १ काल्पनिक वेतन वाढ का ?
उत्तर द्याहटवा31 मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना पण हा नियम लागू होईल का
उत्तर द्याहटवा30 june 2018 la retired teacher aahet tyana milel vetnvadh
उत्तर द्याहटवाहा शासन निर्णय येण्यापूर्वीच ज्या पात्र कर्मचाऱ्यांनी इतरांच्या कोर्ट निकालाचा आधार घेऊन आपापल्या वरिष्ठांकडे १ जुलै ची वेतनवाढ मिळण्याबाबत रितसर अर्ज केलेला असेल तर पेन्शन थकबाकी असा अर्ज केलेल्या दिनांकापासून मिळेल किंवा कसे..?
उत्तर द्याहटवाजून महिन्याच्या शेवटी कोणत्या तारखेला जन्म झालेली व्यक्ती रिटायर होते.
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .