वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३ मार्गदर्शक सूचना , Senior-&-Junior-Grade-Training-2023-Suchana

 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३ मार्गदर्शक सूचना

 



     वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण  नोंदणी सुरु झाली असून दिनांक 29 मे 2023 ते 12 जून 2023 पर्यंत नोदणी सुरू राहणार आहे

प्रशिक्षण नोंदणी साठी येथे click करा.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणसाठी नोंदणी  कशी करावी ? याबाबतची मार्गदर्शक pdf download साठी येथे click करा.

वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत आजपर्यंत आलेले सर्व शासन निर्णय GR download करण्यासाठी येथे click करा.

         मा. शरद गोसावी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत दि २६ मे २०२३ रोजी परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत कि......

१.प्रशिक्षणाकरता नोंदणी करण्यासाठी परिषदेच्या वरील संकेतस्थळास भेट द्यावी, तसेच परिषदेच्या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे 

२. दिनांक 31 मार्च 2024 रोजी सेवेचे एकूण बारा वर्षे पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच बारा वर्षे सेवा पूर्ण झालेली प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

 ३. दिनांक 31 मार्च 2024 रोजी सेवेचे एकूण 24 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 24 वर्षे सेवा पूर्ण झालेली प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

 ४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक 29 मे 2023 ते 12 जून 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. प्रशिक्षण लिंक नोंदणी दिनांक 29 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजेपासून सुरू होईल.

 ५. सदरचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणी नंतर नोंदणी केलेल्या ईमेलवर या कार्यालयामार्फत ईमेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील. 

६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे चार गट करण्यात आलेले आहेत

 गट क्रमांक एक. प्राथमिक गट (इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणारे.)

 गट क्रमांक दोन. माध्यमिक गट (इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गांना अध्यापन करणारी). 

गट क्रमांक तीन. (उच्च माध्यमिक गट इयत्ता अकरावी ते बारावीच्या वर्गांना अध्यापन करणारे. )

गट क्रमांक चार. (अध्यापक विद्यालय गट प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे 

७. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ आयडी, शाळेचा यु-डायस क्रमांक, अचूक ईमेल आयडी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

 ८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ आयडी उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन पोर्टलवर शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी हा पर्यायचा वापर करून आपली नाव नोंदणी करावी. 

9. नाव नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक्य ओटीपी आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

 १०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरत असणारा ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्र व्यवहार व सूचना या नाव नोंदणी करत असताना नोंदवलेल्या ई-मेल आयडी वर पाठवण्यात येतील.

 11. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ईमेल आयडीवर ओटीपी येईल व सदरचा प्राप्त ओटीपी दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ईमेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.

 12. नाव नोंदणी करत असताना आपला ईमेल आयडी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ईमेल आयडी, यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड वरील कोणताही प्रशिक्षणात वापरण्यात आलेला ईमेल आयडी चा वापर करू नये. अन्यथा प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू होण्यासाठी समस्या उद्भवेल.

 13. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल दुरुस्त असल्यास 'माहितीत बदल करा' या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.

 14. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक  शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडिओ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच प्रशिक्षण शी निगडित अद्यावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील .

 15. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्हा नूडल अधिकारी असतील. 

16 प्रशिक्षण शुल्क भरणा करण्यासाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील ,इंटरनेट बँकिंग ,क्रेडिट डेबिट कार्ड ,यूपीआय पेमेंटने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून बनणार आहे, त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदाहरणार्थ यूजर आयडी ,पासवर्ड

 17 सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रुपये 2000 ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट/ डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग/ यूपीआय पेमेंट अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेची कोणताही पत्र व्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी .

18 प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची रिसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ईमेल, प्रशिक्षण गट, प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.

 

19 नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल आयडी वरून trainingsupport@maa.ac.in या  मेल आयडी वर संपर्क करावा. 

20 वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होने करिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाही. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे. 

21 नोंदणी केलेल्या शिक्षकांची उपरोक्त प्रशिक्षण घटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. 

22 शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ निवड श्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय जिल्हास्तरावर करण्यात येईल .

23 सदरची ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केली म्हणजे वेतन श्रेणी  चा लाभ झाला असे नाही तर जिल्हा स्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचे मार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही या दृष्टीने केली जाईल याची नोंद घ्यावी. 

24 सदर प्रशिक्षणासंबंधी अद्यावत माहितीसाठी वेळोवेळी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ पहावे.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .