शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी आठवी) फेब्रुवारी २०२४ पूर्वतयारी व नियोजन
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) फेब्रुवारी 2024 साठी विद्यार्थ्यांची निवड करून आवेदन पत्र भरण्याची तयारी करणे बाबत.......
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी साठी दरवर्षी नऊ ते दहा लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होणे, शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल वाढवणे आवश्यक आहे. विद्यार्थी निश्चित करून त्यांचे आवेदन पत्र भरणे तसेच त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे. त्यासाठी शाळांनी नियोजन करणे, तसेच वेळेत विद्यार्थ्यांची निवड व आवेदन पत्र भरण्याची कार्यवाही करणे आवश्यक्य आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या मागील पाच वर्षात वर्षांची सांख्यिकीय माहितीचे अवलोकन केले असता त्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये प्रविष्ट विद्यार्थी संख्या विचारात घेताना निकालाच्या टक्केवारीत घट झाल्याची दिसून येते.
परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता सन 2024 च्या परीक्षेसाठी शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांची निवड करून आवेदन पत्र भरून घेण्याची कार्यवाही दिनांक १ जुलै 2023 पासून सुरू करण्याचे परिषदेचे नियोजन आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी निश्चित करून त्याप्रमाणे सदर परीक्षेची पूर्वतयारी करून घेता येईल. काही वेळा अह्र्तेसाठी आवश्यक असणारे गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त न झाल्यामुळे उपलब्ध संच विचरीत करता येत नाही, असे संच शिल्लक राहणे योग्य नाही.
त्या अनुषंगाने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेऊन विद्यार्थी निवड करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन करावे व आवेदन पत्र भरण्याची कार्यवाही करण्याबाबतच्या आवश्यक्य सूचना आपले स्तरावरून देण्याची कार्यवाही करावी. परिषदेच्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची माहिती विभागीय स्तरावर सर्व अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन यापूर्वीच माहे एप्रिलमध्ये देण्यात आलेल्या आहेत. याबाबत पुढील कार्यवाही व नियोजन आपली स्तरावरून करणे आवश्यक्य आहे. तशी कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल प्राथमिक माध्यमिक शिक्षण शासनाला व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना सादर करावा.
अधिक माहितीसाठी परिपत्रक पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .