शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक शासकीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३
https://scertmaha.ac.in/vcomp2023/
व्हिडिओ अपलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
(अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२३)
शिक्षकांच्या मध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक ,मुख्याध्यापक यांच्या साठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे.
सदरच्या स्पर्धेचा तपशील खालील प्रमाणे
शिक्षकांनी शिक्षकांनी आपली तयार केलेली व्हिडिओ आपल्या गुगल ड्राईव्हला अपलोड करून एनी वन विथ लिंक करून एडिटर त्याचा एक्सेस हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी. स्पर्धेचे आयोजन तालुका जिल्हा राज्यस्तर करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट व्हिडिओ निवडीचे निकष
- व्हिडिओ निर्मितीसाठी आवश्यक्य आशय, मजकूर आदर्श असावा .
- लिंग समभाव ,शासकीय ध्येय धोरणांची सुसंगत असे असावा.
- व्हिडिओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेल्या असावा.
- व्हिडिओची साईझ विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी .
- निर्मित व्हिडिओमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम.
- व्हिडिओ मधील मजकूर, चित्रे ,रंगसंगती, अचूक व योग्य असावीत.
- शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडिओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी बाबींना महत्त्व असेल.
- आवाजात स्पष्टता असावी. आवाजाची, बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोह आरोहयुक्त असावा. बॅकग्राऊंड नॉईज नसावा. जर बॅकग्राऊंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. बॅकग्राऊंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशियाशी संबंधित असावे.
व्हिडिओ निर्मितीच्या साठी महत्त्वाच्या बाबी
- शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडिओ बनवणे आवश्यक आहे .
- वरील व्हिडिओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडित असणे आवश्यक .
- व्हिडिओ बनवणाऱ्याने स्वतःचा थोडक्यात परिचय समावेश करावा.
- व्हिडिओ कंटेंट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा ,पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नये. व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रीनवर दिसाव्यात.
- व्हिडिओ मधून कोणती अध्ययन निष्पती साध्य होणार आहे हे सुरुवातीला स्क्रीनवर दाखवावे.
- व्हिडिओची लांबी कमीत कमी पाच मिनिटं व जास्तीत जास्त नऊ मिनिटांची असावी.
- व्हिडिओ फॉरमॅट mp4 असावा.
- व्हिडिओमध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यमांची व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी उल्लेख नसावा.
- व्हिडिओ मधील मजकूर व आशिया बाबत पूर्ण संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे याची नोंद घ्यावी.
- व्हिडिओमध्ये मध्ये वापर करण्यात येणारी इमेज अथवा मजकूर हा कॉपीराईट मुक्त असल्याबाबत दक्षता घेण्यात यावी.
- कॉपीराईडची लायसन्सच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काळजी घ्यावी. याबाबत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्धक जबाबदार असतील.
- राज्यस्तरावरून निवड करण्यात आलेल्या व्हिडिओस क्रिएटरला तो व्हिडिओ त्यांनीच तयार केला आहे हे सिद्ध करावे लागेल. अन्यथा तो व्हिडिओ स्पर्धेतून बात करण्यात येईल.
- शैक्षणिक व्हिडिओच्या दर्जेनुसार शिक्षकांना प्रोत्साहन पर बक्षीस दिले जाईल व सदरच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओज ही त्याच्या क्रियेटर च्या नावासह शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
- शॉट किंवा कोणतेही कॉपीराईट केलेले ग्राफिक्स इमेज संकरित करून तयार केलेले व्हिडिओ स्पर्धेसाठी पात्र नसतील.
- एका स्पर्धकाने एका गटासाठी फक्त एकच व्हिडिओ पाठवावा.
- सर्व नोंदींची एक प्रत संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची कडे राखून ठेवली जाईल .
- पुरस्कार विजेच्या व्हिडिओचे प्रसारण दीक्षा आणि SCERT द्वारे व्यवस्थापित इतर वेबसाईट पोर्टलवर अपलोड करण्यात येईल.
- तालुका, जिल्हा ,राज्य स्तरावरील स्पर्धेचे निकाल तालुका, जिल्हा, राज्य निवड समितीमार्फत अंतिम केला जाईल.(स्वतंत्रपणे ऑडिओ आणि आणि ॲनिमेशन डिजिटल गेम्स आणि एप्लीकेशन श्रेणीसाठी) ज्युरी ने घोषित केलेले निकाल बंधनकारक असतील.
व्हिडिओ रद्द करण्याचे अधिकार
- कोणत्याही प्रकारची हिंसा ,लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा ,आमली पदार्थाचा वापर यांचा व्हिडिओ निर्मिती समावेश असल्यास.
- वांशिक ,सांस्कृतिक, धार्मिक, स्त्रिया किंवा लिंग पूर्वा ग्रहाचे समर्थन करणारी सामग्री व्हिडिओ निर्मितीत समाविष्ट असल्यास
- तांत्रिक त्रुटी असल्यास उदाहरणार्थ सुरू होणं मध्येच बंद पडणे
- कोणत्याही कॉपीराईट कायद्याची उल्लंघन असल्यास
- साहित्यिक चोरीचा समाज असल्यास
निवड समितीची रचना
वरील प्रमाणे प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विषय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. सदर उत्कृष्ट शिक्षकांना उपरोक्त प्रमाणे रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धक यांनाही सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. सदर निवड करण्याकरता तालुका जिल्हा व राज्यस्तरावर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यास शासन मान्यता देत आहे.
सदर स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्याची अधिकार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांना असतील.
तालुका स्तर ,जिल्हा स्तर व राज्य स्तर कमिटी
व्हिडीओ निर्मिती स्पर्धेची व्हिडीओ अपलोड करण्याची लिंक मिळाली नाही
उत्तर द्याहटवाव्हिडिओचे मूल्यमापन करत असताना तो व्हिडिओ किती लोकांनी पाहिला त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट्स याचा विचार होणार आहे का?किंवा अशा प्रकारेकिंवा अशा प्रकारे कमेंट साठी पाठवल्या जाणार आहेत का?
उत्तर द्याहटवाप्लीज रिप्लाय
व्हिडिओनिर्मितीचे रिझल्ट कधी लागणार किंवा कसे बघता येणार
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .