जिल्हांतर्गत बदली कार्यमुक्ती बाबत परिपत्रक दि ४ मे व २४ फेब्रुवारी २०२३
अर्थ व स्पष्टीकरण
महाराष्ट्र शासनाचे उपसचिव पो. द. देशमुख यांनी दि ४ मे २०२३ रोजी वरील बदली परिपत्रक निर्गमित केले आहे ...
या परिपत्रकानुसार
दिनांक 7 एप्रिल 2021 च्या रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाअंतर्गत बदल्या या संगणकीय प्रणाली द्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याचे कार्यवाही पूर्ण झालेली आहे.
यास अनुसरून असे कळविण्यात येते की सन २०२२ मधील जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतील ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्याची बदली करण्यात येऊ नये किंवा याचिकाकर्त्यांच्या बदली स्थगिती देण्याबाबत मा. न्यायालयाचे निर्देश आहेत असे शिक्षक वगळता अन्य शिक्षकांना शासनाने दि. 24 फेब्रुवारी 2023 च्या पत्रांमुळे दिलेल्या निर्देशानुसार कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.
दि २४ फेब्रुवारी २०२३ चे परिपत्रक खाली पहा.
दि २४ फेब्रुवारी २०२३ च्या imp परिपत्रकानुसार
जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक 1 मे 2023 ते दिनांक 15 मे 2023 पर्यंत कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दिनांक 16 मे 2023 ते दिनांक 31 मे 2023 या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी.
टीप : वरील दोन्ही परिपत्रके पाहता लवकरच वरील प्रमाणे कार्यमुक्तीची कार्यवाही होईल. कार्यमुक्ती बाबत १५ मे पूर्वी CEO आदेश काढतील व कार्यमुक्तीची प्रक्रिया ३१ मे पूर्वी पूर्ण होईल. काही जिल्हा परिषदांनी कार्यवाही सुरु केलेली आहे.
बुलढाणा जिल्हा परिषद कार्यमुक्तीचे आदेश केव्हा प्राप्त होतील
उत्तर द्याहटवागडचिरोली जिल्हा परिषद ची यादि व कार्यमुक्ती आदेश केव्हा प्राप्त होतील
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .