आंतर जिल्हा बदली प्रक्रिया २०२३, परिपत्रक दि ४ मे २०२३ पूर्वतयारी व सूचना

 आंतर जिल्हा बदली प्रक्रिया २०२३ पूर्वतयारी व सूचना 



 महाराष्ट्र शासनाचे  उपसचिव पो. द. देशमुख यांनी दिनांक 4 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार......

       जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत दिनांक 7 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयामुळे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सन 2022 मध्ये आंतर जिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन पोर्टल द्वारे पारदर्शी पद्धतीने राबवण्यात आलेली आहे. सदर प्रक्रिया राबवताना विविध शिक्षक संघटनांकडून प्राप्त झालेली निवेदने व न्यायालयीन प्रकरणी विचारात घेता सन 2023 आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिये बाबतच्या शासन निर्णय यामध्ये सुधारणा सुचवण्याकरिता दिनांक 14 मार्च 2023 रोजी च्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट गठीत करण्यात आलेला आहे. सदर अभ्यास गटाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनानुसार दिनांक 7 एप्रिल 2021 रोजीच्या आंतरजिल्हा बदली बाबतच्या शासन निर्णय यामध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू आहे.

        याकरिता सन 2023 साठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबवण्याच्या अनुषंगाने खालील मुद्द्यानुसार कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना कळविण्यात यावे.

1. निव्वळ रिक्त पदांची यादी. (clear vacancy) 

2. शिक्षकांचे रोस्टर बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे.

3. सन 2023 च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणारे जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत अशा शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबाबत दिलेल्या संमती पत्राबाबत निर्णय घेणे.

 4. सन 2023 च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनुसूचित जमातीचे शिक्षक स्थानिक अनुसूचित जमातीचे आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी करून त्यांना संमती पत्र देणे.

 5. सन 2023 च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून काही न्यायालयीन/ लोकायुक्त / अन्य न्यायाधीकरण यांचे स्वयं स्पष्ट आदेश असल्यास अशा आदेशांची प्रत मूळ याचिकेची प्रत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देणे.

        वरील प्रमाणे कार्यवाही दिनांक 15 मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.

अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक वाचा.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.