UDise + पोर्टल वर शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन कसे करावे ?
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई च्या सहा. संचालक (कार्यक्रम) सरोज जगताप यांनी दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार........
भारत सरकार शिक्षण मंत्रालय यांच्याकडे राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस संदर्भात 2022-2023 मध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. यु-डायस प्लस मध्ये राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करण्याकरता शाळा स्तरावर टॅब ओपन झालेली आहे. सर्व शाळांना आधार व्हॅलिडीटी व्हॅलिडेशन करण्याकरता शाळांतील मुख्याध्यापकांना कळविण्याची सूचना परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे. व्हॅलिडेशन करताना अडचणी येत असल्यास आधार कार्ड वर नोंदवलेले नावाप्रमाणे यु-डायस प्लस मध्ये नाव नोंदविण्यात यावे. सदर व्हॅलिडेशन दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण करण्याकरता प्रणाली सुरू ठेवण्यात आलेली आहे. अशा सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.खाली परिपत्रक पहा.
Udise Plus
Teacher Module शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन कसे करावे ?
https://udiseplus.gov.in/udiseteacher/home
(Teacher Module click here डायरेक्ट लिंक)
- सर्वप्रथम यु-डायस प्लस पोर्टल ला जाऊन टीचर मॉड्युल वर जावे.
- त्या ठिकाणी आपला यु-डायस कोड, पासवर्ड व कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे.(खालील स्क्रीन पहा.)
- लॉगिन झाल्यानंतर क्लिक हियर टू ओपन टीचर data ला click करावे. (खालील स्क्रीन पहा.)
- क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल
- त्या ठिकाणी शिक्षकांच्या संख्येला क्लिक करावे. (खालील स्क्रीन पहा.)
- सर्व शिक्षकांची माहिती असणारे पेज ओपन होईल.
- आधार व्हेरिफाइड स्टेटस मध्ये आपले स्टेटस दिसेल.
- व्हेरिफाय करण्यासाठी व्हेरिफाय आधार फ्रॉम यूआयडी याला क्लिक करावे.
- आपल्यासमोर व्हेरी फाय झाल्यानंतर आपल्यासमोर व्हेरिफाय सक्सेसफुली असा मेसेज येईल व स्टेटस मध्ये व्हेरिफाइड फ्रॉम यूआयडी व व्हेरिफिकेशन डेट येईल. (खालील स्क्रीन पहा.)
- महत्वाचे : जर आधारची माहिती अध्याप भरलीच नसेल / चुकली असेल तर Update मध्ये त्या शिक्षकाच्या जनरल प्रोफाइल मध्ये जाऊन आधार नंबर व नाव आधार प्रमाणे दुरुस्त करून घ्यावी व त्यानंतर व्हेरिफाय आधार करावे. व्हॅलिडेशन करताना अडचणी येत असल्यास आधार कार्ड वर नोंदवलेले नावाप्रमाणे यु-डायस प्लस मध्ये नाव नोंदविण्यात यावे. जस आधार कार्ड वर नाव आहे तसच, त्याच क्रमाने नाव जनरल प्रोफाईल मध्ये अपडेट / save करून मगच आधार verify करा.
Udise+ चा user I'd व password कोणता असेल
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .