UDise + पोर्टल वर विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन कसे करावे ?

 UDise + पोर्टल वर विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन कसे करावे ?



आपण थेट विद्यार्थी मोड्यूल ला ( SDMS)

 जाण्यासाठी येथे click करा.

(किंवा खालील पायऱ्यांनी पुढे जा.)

  •    प्रथमतः यु-डायस प्लस पोर्टलला जावे. वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या लॉगिन फॉर ऑल मॉड्युल्स याला क्लिक करावे. (खालील स्क्रीन पहा.)


  • त्यानंतर स्टुडन्ट मोड्यूल याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे नाव सेट करावे व गो म्हणावे. त्यानंतर समोर अशी स्क्रीन येईल. (खालील स्क्रीन पहा.)


  •  या ठिकाणी महाराष्ट्र याला क्लिक करावे. (खालील स्क्रीन पहा.)


 
  • यूजर आयडी समोर दिसणाऱ्या पेजवर युजर आयडी, पासवर्ड व कॅपच्या टाकावा लॉगिन म्हणावे. (खालील स्क्रीन पहा.)



  •  आपल्यासमोर असे पेज ओपन होईल. समोर दिसणारी विंडो माहिती पाहून क्लोज करावी. (खालील स्क्रीन पहा.)




  •  त्यानंतर असे पेज दिसेल. या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑल स्टुडन्ट याला क्लिक करावे. (खालील स्क्रीन पहा.)





  •  त्यानंतर आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती दिसेल. (खालील स्क्रीन पहा.)


  •  विद्यार्थ्याच्या नावापुढे आधार व्हॅलिडीटी या टॅब मध्ये विद्यार्थ्यांच्या नावासमोर व्हॅलिडेट आधार फॉर नेम हे दिसेल. व्हॅलिडेट करण्यासाठी त्याला क्लिक केल्यानंतर आधार सक्सेसफुली झाला तर व्हेरिफाइड फ्रॉम यूआयडी असा मेसेज ग्रीन मध्ये दिसेल. जर झालं नाही तर व्हेरिफिकेशन फेल्ड फ्रॉम यूआयडी असे दिसेल.त्या ठिकाणी कारण दिसेल. (खालील स्क्रीन पहा.)




  •  ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरिफाय होणार नाही, त्या विद्यार्थ्यांच्या नावावर क्लिक करून, त्या विद्यार्थ्यांचे  नाव आधारनुसार अपडेट करावे व पुन्हा व्हॅलिडीटी ला क्लिक करावे. अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपणास व्हॅलिडेट आधार फॉर नेम याला क्लिक करून वेरिफिकेशन करावे लागेल.(खालील स्क्रीन पहा.)



  • जर एखाद्या विद्यार्थ्याचे आधार व्हेरिफाय झाले नसेल तर विद्यार्थ्यांच्या नावाला क्लिक करून ओपन होणाऱ्या जनरल इन्फॉर्मेशन स्टुडन्ट याच्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव ,आधार प्रमाणेच टाकावे. त्याच पद्धतीने जेंडर व जन्मतारीख आधार प्रमाणे आहे का ते चेक करावे.त्यानंतर अपडेट म्हणावे. नंतर पुन्हा तो विद्यार्थी अपडेट होऊन जाईल. आधार व्हेरिफाइड फ्रॉम यूआयडी होऊन जाईल.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .