उन्हाळी सुट्टी, वार्षिक निकाल व पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरु करणे बाबत
शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रीकृष्ण कुमार पाटील यांनी दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी परिपत्रक निर्गमित केले या परिपत्रकानुसार.......
१. मंगळवार दिनांक 2 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दिनांक 11 जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सण 23-24 मध्ये दुसरा सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी सुरू होतील.
२. इयत्ता पहिली ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचा निकाल दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल तथापि तो निकाल विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.
३. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्या ऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांची प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक ते निर्देश आपले स्तरावरून द्यावेत.
४. माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
५. वरील प्रमाणे शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले स्तरावर संबंधितांना सुचित करावे अशा प्रकारचे पत्र काढलेले आहे. अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.
टीप : शासन निर्णय दिनांक 11 एप्रिल 2022 नुसार यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेतात जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील. खालील GR वाचा.
(११ एप्रिल २०२२ चा संपूर्ण शासन निर्णय download करण्यासाठी येथे click करा.)
पुढील शैक्षणिक वर्ष 2024 चे इयत्ता 5वी ते 10 चे वेळापत्रक कसे असेल माहिती असल्यास सेंड करावे 🙏
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .