शैक्षणिक सर्वेक्षण टप्पा क्र. ३, सन २०२२-२०२३

 शैक्षणिक सर्वेक्षण टप्पा क्र. ३, सन २०२२-२०२३ 


      

कराड तालुका सर्वेक्षण चाचणी सोडवण्यासाठी येथे click करा.


पाटण तालुका सर्वेक्षण चाचणी सोडवण्यासाठी येथे click करा.


शैक्षणिक सर्वेक्षण चाचणी कशी सोडवावी ?

            सर्व विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण चाचणी सोडवण्यासाठी दिलेली आपल्याच तालुक्याची लिंक open करून सर्वप्रथम आपले केंद्र निवडावे.त्यानंतर  next करावे . आपली शाळा निवडावी . त्यानंतर  next करावे .विद्यार्थ्याचे नाव कॅपिटल मध्ये लिहा उदा. PANDURANG SADASHIV SANE. त्यानंतर  next करावे. आपल्या समोर विषय निहाय प्रश्नावली दिसेल. सर्व प्रश्नांचे पर्याय निवडून सर्वात खाली असणाऱ्या submit ला click करावे .आपली प्रश्नावली सोडवल्या बद्दल चा मेसेज समोर दिलेलं . मग आपले काम पूर्ण होईल . याचा स्क्रीन शॉट काढून शाळेच्या group वर शेअर करावा.

(सुरवातीला काही काळ सर्वर प्रॉब्लेम मुळे लिंक open होण्यास अडचणी निर्माण होवू शकतात किंवा आपल्या समोर i am not robot असे दिसल्यास चेक box ला click करावे.सर्व शाळा व विद्यार्थी एकाच वेळी चाचणी सोडवत असल्याने सर्वर प्रॉब्लेम होत असल्याने थोड्या थोड्या वेळाने प्रयत्न करू शकता.)


सर्वेक्षण    

          सन २०२४ मध्ये होवू घातलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वे मध्ये ३० % संपादणूक वाढीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे . यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या धर्तीवर रविवार दि. १६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ठीक ९ ते १२ या वेळेत सातारा जिल्हास्तरीय शैक्षणिक सर्वेक्षण आयोजित करण्यात येत आहे .

शैक्षणिक सर्वेक्षण बाबत मार्गदर्शक सूचना

१) ही चाचणी किंवा परीक्षा नसून हे एक शैक्षणिक सर्वेक्षण आहे. यामधून प्राप्त माहितीचा उपयोग विद्यार्थ्याची शैक्षणिक स्थिती आणि शिकण्यातील अडचणी समजून घेऊन कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे अत्यंत वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

२) सदरचे सर्व्हेक्षण हे जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसाहित खाजगी शाळा (इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा वगळून )इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे होईल. इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा या सर्व्हेक्षण मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा शाळांना लिंक पाठवू नये.

३) सर्व्हेक्षण लिंक रविवार दि: १६/०४/२०२३ रोजी सकाळी  ९ :०० ते १२:०० या कालावधीत सुरू राहील.

४) लिंक पालक व विद्यार्थ्यांपर्यंत वेळेपूर्वी पोहोचली तरीही लिंक दिलेल्या वेळेच्या मर्यादेतच ओपन राहणार आहे. म्हणजे रविवार दि. : १६ /०४ /२०२३ रोजी सकाळी  ९ :०० ते १२:०० या वेळेत चालू राहील.नंतर लिंक बंद होईल. 

५) जिल्हा स्तरावरून प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यवेक्षिय यंत्रणेने आपल्याच तालुक्याची लिंक पालकांपर्यंत पोहचेल याची काळजी घ्यावी. पालकांना संबंधित शाळेचे केंद्र कोणते आहे हे शिक्षकांनी आधीच सांगावे.

६) संबंधित तालुक्याची लिंक ओपन केल्यानंतर केंद्रांची नावे येतील. केंद्र सिलेक्ट केल्यानंतर शाळांची नावे येतील. त्यानंतर विद्यार्थ्याचे/ मुलाचे नाव टाकून तो सध्या ज्या इयत्तेत/ वर्गात शिकत आहे ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे. या सर्व बाबी लिंक मध्ये आहेत. विद्यार्थ्याने फक्त आपले नाव कॅपिटल English मध्ये टाइप करून सर्व्हे फॉर्म भरायचा आहे. उदा. PANDURANG SADASHIV SANE

७) पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यास फक्त तांत्रिक मदत करायची आहे.

८) सर्व्हेमधील प्रश्न बहुपर्यायी आहेत.

९) विद्यार्थ्याने एकदाच सर्व्हे फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. फक्त पहिला रिस्पॉन्स ग्राह्य धरला जाईल.

१०) सर्व्हेची वेळ व कार्यपद्धती या बाबतीत पालकांना अवगत करावे. 

टिप्पणी पोस्ट करा

42 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. ज्ञानेश्वरी अजय ढेंबरे

    उत्तर द्याहटवा
  2. ज्ञानेश्वरी अजय ढेंबरे

    उत्तर द्याहटवा
  3. वैष्णवी महेंद्र थोरात

    उत्तर द्याहटवा
  4. वैष्णवी महेंद्र थोरात

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .