उन्हाळी सुट्टी, वार्षिक निकाल व पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरु करणे बाबत

 उन्हाळी सुट्टी, वार्षिक निकाल व पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरु करणे बाबत 



शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्या दिनांक 28 एप्रिल 2023 च्या परिपत्रकानुसार......

  •           दि. एक मे 2023 रोजी महाराष्ट्र दिन सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात यावा.
  •   राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन 2022-23 चा निकाल जाहीर करावा. आणि विद्यार्थी पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे. तसेच निकालासोबत उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा.
  •      दिनांक 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णय आणि शिक्षण संचनालयाचे दिनांक 20 एप्रिल 2023 चे परिपत्रकामध्ये दिलेल्या सूचनानुसार शाळांच्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन 2023 सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्या दिनांक 20 एप्रिल 2023 च्या सध्या शाळांना लागू असणार्या  परिपत्रकानुसार......
  • मंगळवार  दिनांक 2 मे 2023 पासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी बुधवार  दिनांक 1४  जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सण 23-24 मध्ये गुरुवार दिनांक 1५  जून 2023 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा शक्रवार  दि ३०  जून 2023 रोजी सुरू होतील. (सर्व परिपत्रके खाली पाहू शकता.)




उष्णतेच्या लाटेमुळे विद्यार्थ्यांना  दि २१ एप्रिल २०२३ पासून सुट्टी बाबत दि २० एप्रिल २०२३ चा वरील शासन निर्णय GR वाचा. 

शाळांबाबत खालील दि.२० एप्रिल २०२३ चे संचालक ( प्रा) परिपत्रक पहा.

(शाळांच्या सुट्ट्याबाबत  शिक्षणाधिकारी यांचे सविस्तर पत्र लवकरच येईल.)


शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी दिनांक २० एप्रिल 2023 रोजी परिपत्रक निर्गमित केले या परिपत्रकानुसार.......

१. मंगळवार दिनांक 2 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी बुधवार  दिनांक 1४  जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सण 23-24 मध्ये गुरुवार दिनांक 1५  जून 2023 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा शक्रवार  दि ३०  जून 2023 रोजी सुरू होतील.

 २. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा  निकाल दिनांक २९ एप्रिल 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल, तथापि तो निकाल विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.

 ३. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्या ऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांची प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक ते निर्देश आपले स्तरावरून द्यावेत.

४.बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील परिशिष्ट  मध्ये  शालेय कामकाजाचे किमान दिवस 

अ. १ ली ते ५ वी साठी किमान २०० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान ८०० घड्याळी तास 

ब. ६ वी ते ८ वी साठी किमान २२० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान १००० घड्याळी तास निश्चित केले आहेत .

 ५. माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

      वरील प्रमाणे शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले स्तरावर संबंधितांना सुचित करावे अशा प्रकारचे पत्र काढलेले आहे. अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.