शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी 2023 पाचवी व आठवी अंतरिम निकाल
विद्यार्थी निकाल स्वतंत्रपणे पाहण्यासाठी येथे click करा.
(विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी फक्त विद्यार्थी सिट/परीक्षा नंबर आवश्यक )
शाळा निकाल एकत्रित पाहण्यासाठी येथे click करा.
(शाळा एकत्रित निकाल पाहण्यासाठी व pdf मध्ये download/Print साठी शाळेचा Udise नंबर व Password आवश्यक, शाळा login केल्यावर Dashboard वर उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या Interim Result 5th/8th ला click करा.)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १२ फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी चा अंतरिम निकाल शनिवार दि २९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी परिषदेच्या अधिकृत वरील संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या वरील लॉगिन मधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल वरील संकेतस्थळावर थेट पाहता येईल.
गुण पडताळणी विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिन मध्ये दिनांक 29 एप्रिल 2023 ते दिनांक 9 मे 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपर करिता रुपये 50 याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंट द्वारे भरणे आवश्यक आहे.
दुरुस्ती विद्यार्थ्यांचे नाव ,आडनाव , वडिलांचे नाव आईचे नाव, शहरी /ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दिनांक 9 मे 2023 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. विहित मुरतीत आवश्यक ते शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जा नुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसापर्यंत कळवण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.- विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्यांचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक, दिव्यांग व आरक्षणाचा प्रवर्ग या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळा login करून dashboard त्याच्या नावासमोरील Imp Edit या बटनावर क्लिक करावे. तसेच इतर माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करावे.
- विद्यार्थी शिकत असलेल्या अभ्यासक्रम या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह puppsshelpdesk@gmail.com या हेल्पलाईन इमेलला विनंती अर्ज सादर करावा.
968
उत्तर द्याहटवारोहन संदीप सुरवसे
हटवा968
उत्तर द्याहटवा968
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .