जिल्हांतर्गत बदली टप्पा क्र ६ बाबत दि १६ मार्च २०२३ रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्त मधील चर्चेचे मुद्दे व घेतलेले निर्णय,परिपत्रक दि ५ एप्रिल २०२३ अर्थ व स्पष्टीकरण

जिल्हांतर्गत बदली टप्पा क्र ६ बाबत दि १६ मार्च २०२३ रोजीच्या बैठकी च्या इतिवृत्त मधील चर्चेचे मुद्दे व घेतलेले निर्णय परिपत्रक दि ५ एप्रिल २०२३

अर्थ व स्पष्टीकरण  





              माननीय मंत्री ग्राम विकास महोदयांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन मुंबई येथे गुरुवार दिनांक 16 मार्च 2013 रोजी दुपारी ४  वाजता बैठक झाली. त्या बैठकीचे इतिवृत्त खालील प्रमाणे......

         विषय : शिक्षकांच्या ऑनलाईन बदली संदर्भातील टप्पा क्रमांक सहा बाबत आयोजित करण्यात आलेली बैठक

 वरील विषयांकित प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे तथा अध्यक्ष अभ्यास गट जिल्हाअंतर्गत व आंतर जिल्हा प्राथमिक शिक्षक बदली यांनी शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदली संदर्भात माहिती सर्व सन्माननीय सदस्यांना दिली. त्या अनुषंगाने बैठकीत विस्तृत चर्चा बैठकीची कार्यवृत्त खालील प्रमाणे.....

चर्चेचा मुद्दे व निर्णय  

 १.सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या परंतु एका शाळेत सलग पाच वर्षे सेवा पूर्ण झालेली नाही अशा शिक्षकांना बदलीच्या सहाव्या टप्प्यातून सूड देण्यात यावी.

 बैठकीत घेतलेला निर्णय

               शासन निर्णय दिनांक 07 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 1.10 नुसार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक्य असल्याने सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकाची दहा वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे, अशा शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही तसेच अवघड क्षेत्रातील रिक्त जागा सेवा जेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना वास्तव्य सेवा जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून प्रस्थापित करण्यात येईल अशी तरतूद आहे. काही शिक्षक नियुक्तीच्या दिनांक पासून दीर्घकाळ सर्वसाधारण क्षेत्रातच कार्यरत आहेत. त्यामुळे अवघड क्षेत्रात सेवा देणाऱ्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये बदलीने येण्यासाठी रिक्त पदे उपलब्ध होत नाहीत ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी माननीय सदस्यांच्या निदर्शनास आणली. यापैकी जे शिक्षक संवर्ग एक मधील आहेत तसेच ज्यांचे वय 53 वर्षे पूर्ण आहे अशा शिक्षकांना सदर प्रक्रियेमधून होकार नकार देण्याची सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीसाठी पुरेशी संधी उपलब्ध करून देण्याकरता सर्वसाधारण क्षेत्रात किमान दहा वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांचा या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना सूट देता येणार नाही. सर्व सन्माननीय सदस्यांनी या निर्णयास सहमती दर्शवली.

२. सहाव्या टप्प्यांमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांच्या वयोमर्यादा बाबतचा आधारभूत दिनांक 30 जून 2022 ऐवजी 2023 मधील धरण्यात यावी.

 बैठकीत घेतलेला निर्णय

           शासन निर्णय दिनांक 4 5 2022 अन्वये सन 2022 मध्ये होणाऱ्या बदलीकरिता पदावलीची परिघना दिनांक 31 .5. 2022 ऐवजी दिनांक 30. 6. 2022 पर्यंत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व शिक्षकांची माहिती ऑनलाईन बदली प्रणालीवर भरण्यात आलेली आहे. जिल्हांतर्गत बदलांची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने सहाव्या टप्प्यांमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांच्या वयोमर्यादी बाबतच्या आधारभूत दिनांक मध्ये बदल करता येणार नाही. सर्व सन्माननीय सदस्यांनी या निर्णयात सहमती दर्शवली.

३.जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेच्या सहाव्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील दुर्गम भागातील शाळांमधील रिक्त जागांचा समावेश असल्याने अशा ठिकाणी महिला शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये.

 बैठकीत घेतलेला निर्णय

            अन्य संवर्गातील महिला कर्मचारी जसे तलाठी, ग्रामसेविका, कृषी सहाय्यक यांची अवघड क्षेत्रात नियुक्ती करणेस प्रतिबंध नाही. त्यामुळे सामान न्यायाने  महिला शिक्षकाची नियुक्ती अवघड क्षेत्रात कारण्यावर प्रतिबंध लावता येणार नाही. कोणतेही गाव, क्षेत्र, महिला शिक्षकांच्या नियुक्तीस प्रतिकूल घोषित करणे ही घटनेच्या कलम 14 शि विसंगत आहे. अशी अभ्यास गटाची शिफारस असल्याने तसेच महिला शिक्षकांची अवघड क्षेत्रातील नियुक्ती तेथील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार असल्याने अवघड ठिकाणी झालेल्या होणाऱ्या महिला शिक्षकांच्या बदल्या रद्द करणे योग्य होणार नाही. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी माननीय सदस्यांचे निदर्शनास आणली. त्यामुळे अशा महिला शिक्षकांना सूट देता येणार नाही .सर्व सन्माननीय सदस्यांनी या निर्णयास सहमती दर्शवली.

४.शिक्षकांच्या ऑनलाइन बदली संदर्भातील टप्पा क्रमांक सहा स्थगित करता येईल का ?

 बैठकीत घेतलेला निर्णय
    १. दीर्घकाळ सर्वसाधारण क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात पदस्थापित केल्याने सर्वसाधारण क्षेत्रात जागा रिक्त होतील अशा जागांवर पुढील बदली प्रक्रियेत संवर्ग एक, दोन तसेच अवघड क्षेत्रातील लोकांना संधी उपलब्ध होईल.
 २. या टप्प्याबाबतच्या तरतुदी राईट टू एज्युकेशन व पीईएसए कायद्याची सुसंगत असल्याने सदर टप्पा राबवणे आवश्यक आहे.
 ३. आतापर्यंत पार पडलेली जिल्हांतर्गत भरती प्रक्रिया ही पूर्ण शासन निर्णय तरतुदीनुसार ऑनलाइन पारदर्शक पद्धतीने राबवली आहे. सदर राऊंड स्थगित करावयाचा झाल्यास शासन निर्णयातील तरतुदी विरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. असे केल्यास आत्तापर्यंत बदली प्रक्रियेतून गेलेल्या इतर संवर्गाकडून ही अशा प्रकारची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर राउंड राबवण्याचे कार्यवाही पूर्ण होणे आवश्यक आहे. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी माननीय सदस्यांच्या निदर्शनास आणली. सर्व सन्माननीय सदस्यांनी या निर्णयासमती दर्शवली.

            उपरोक्त प्रमाणे चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली बाबतचा सहावा टप्पा विहित वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात यावा असा सर्वानुमती निर्णय घेण्यात आला.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.