संपात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा अनुपस्थित कालावधी चा कालावधी नियमित करण्याबाबत शासन निर्णय दि २८ मार्च २०२३ अर्थ व स्पष्टीकरण

 संपात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा अनुपस्थित कालावधी नियमित करण्याबाबत शासन निर्णय दि २८ मार्च २०२३ 

अर्थ व स्पष्टीकरण



                         बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत...

                       सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 28 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार..... 

                      बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संपून आंदोलनासंदर्भाबाबत शासनास नोटीस दिली होती. सदर संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये असे आवाहन संदर्भाधीन शासन परिपत्रकांवर करण्यात आली होती. तरीही संपामध्ये काही कर्मचारी अधिकारी सहभागी झाले. माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात त्रिसदिसीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर दिनांक 20 मार्च 2023 रोजी बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आला. या संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी हा कार्यालयात अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती नियमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.....!!!

                       शासन निर्णयानुसार बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च 2023 ते दिनांक 20 मार्च 2023 या कालावधीत संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न पकडता "असाधारण रजा" म्हणून नियमित करण्यात यावी. तथापि सदर असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक सेनिवे  1001/२९ / सेवा ४  दिनांक 14 /1/ 2001 च्या आदेशास अपवाद करून सेवेतील खंड न समजता निवृत्तीवेतनासाठी अहर्ताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.

अधिक माहिती करिता खालील GR वाचा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .